डिसेंबरमध्ये श्रीशैल पीठामार्फत महापदयात्रेचे आयोजन

नूल (प्रतिनिधी) : श्रीशैल पीठामार्फत काढण्यात येणारी महापदयात्रा, विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम व जनजागृती मेळाव्यात महाराष्ट्रातील सदभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठामध्ये आयोजित केलेल्या सदभक्तांच्या मेळाव्यामध्ये श्रीशैल जगद्गुरु बोलत होते. यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, गौरीशंकर शिवाचार्य स्वामीजी, आमदार राजेश… Continue reading डिसेंबरमध्ये श्रीशैल पीठामार्फत महापदयात्रेचे आयोजन

पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : मुश्रीफ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शहराच्या नदीवेस परिसरासह तालुक्यातील पंचवीस गावे महापुराच्या विळख्यात येतात. यंदाची संभाव्य पूर परिस्थितीत हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती प्रशासन अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. माजी ग्रामविकासमंत्री व आ. हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील शासकीय विश्रामगृहात संभाव्य पूरस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. शहरातील चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीबाबतही आ. मुश्रीफ यांनी आरोग्य विभागासह मुख्याधिकाऱ्यांकडून माहिती घेताना… Continue reading पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : मुश्रीफ

वाघुर्डे येथे मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया शिबिर

कळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे, ता. पन्हाळा येथे कुंभी धामणी सामाजिक आरोग्य शैक्षणिक संस्था व युवा सेना पन्हाळा तालुका उपप्रमुख कृष्णात शिखरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे नरहरी मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते. याचा परिसरातील १०० नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन सरपंच अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स हॉस्पिटल, सांगलीमार्फत १०० नागरिकांची… Continue reading वाघुर्डे येथे मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया शिबिर

शेतकऱ्यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेती करावी : चव्हाण

दिंडनेली प्रतिनिधी : पुढच्या येणाऱ्या पिढीला रासायनिक खतांचा वारसा देणे अयोग्य आहे. १०० टक्के सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कीटकनाशक मुक्त भाजीपाला पिकविण्यासाठी सेंद्रिय शेती हा एकमेव पर्याय आहे. जिवामृत शेतीला प्राधान्य दयायला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे  कृषी विभागाच्या जि.प. व पं.… Continue reading शेतकऱ्यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेती करावी : चव्हाण

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी : रेखावार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तरुण-तरुणींनी उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या… Continue reading तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी : रेखावार

महागाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महागाव (वार्ताहर) : दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महागाव येथील यूथ सर्कलमार्फत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुंडापान्ना साव्यान्नावर होते. राम किंकर यांनी यूथ सर्कलच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या पवन लोहार, संकेत लोहार, प्रथमेश सुतार, मैथली किंकर, वैभवी तौकरी, वैभवी आसलकर,… Continue reading महागाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ठाकरे सरकारचा बंडखोर शिंदे गटाला दणका, खात्यांचे फेरवाटप

मुंबई (प्रतिनिधी) : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव… Continue reading ठाकरे सरकारचा बंडखोर शिंदे गटाला दणका, खात्यांचे फेरवाटप

कोल्हापुरात दोघांकडून ३१ किलो गांजा जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचा सुमारे ३१ किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा, मारुती कार, मोबाईल असा एकूण ९ लाख ८७ हजार ५०० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हयात… Continue reading कोल्हापुरात दोघांकडून ३१ किलो गांजा जप्त

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी वाढली चिंता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या तीन वर्षांपासून महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व जोरदार पावसाच्या सरींनी बळीराजांनी आनंदाने पेरणी करून घेतली होती. त्यानंतर हुकमी असा पाऊस पडलाच नसल्याने चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात पावसाअभावी वाढली चिंता

अजित पवारांना बोलू न देणे महाराष्ट्राचा अपमान : सुळे

पुणे (प्रतिनिधी) : देहू येथील संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले; पण या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन आता सुप्रिया सुळे… Continue reading अजित पवारांना बोलू न देणे महाराष्ट्राचा अपमान : सुळे

error: Content is protected !!