दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (१९ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! दख्खनचा राजा श्री जोतिबाची आजची (१९ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग ३ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील दुसरी दुर्गा गजेंद्रलक्ष्मी (मुक्तांबिका) देवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग २ (व्हिडिओ)

शारदीय नवरात्रानिमित्त जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांमधील पहिली दुर्गा एकवीरादेवीची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

नवरात्रोत्सव दुसरा दिवस : श्री अंबाबाईची पूजा ‘पराशरांना महाविष्णू स्वरूपात दर्शन’ स्वरुपात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास कालपासून (शनिवार) प्रारंभ झाला आहे. आजच्या दिवशी श्री अंबाबाईची महापूजा ‘पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन’ स्वरुपात बांधण्यात आली आहे. द्वितीयेला करवीरनिवासिनी ही पराशरांना महाविष्णुस्वरुपात दर्शन देताना विराजमान झालेली आहे. याची पार्श्वभूमी अशी की, श्री महालक्ष्मी जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन देते, तेव्हा… Continue reading नवरात्रोत्सव दुसरा दिवस : श्री अंबाबाईची पूजा ‘पराशरांना महाविष्णू स्वरूपात दर्शन’ स्वरुपात

भवानी मंडपात फलाहार रूपातील पूजा बांधण्यात आली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच सण सध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे यावर्षी नवरात्रोत्सवही साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. पण उत्सवातील सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडणार आहेत. कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे भवानी मंडपात आज (रविवारी) फलाहार रूपातील पूजा बांधण्यात आली. दसऱ्यानिमित्त विविध रूपातील पुजा बांधण्यात येते. रविवारी फलाहार रूपातील… Continue reading भवानी मंडपात फलाहार रूपातील पूजा बांधण्यात आली

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची आजची (१८ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर (व्हिडिओ)

सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची आजची (१८ ऑक्टोबर) आरती पहा ‘लाईव्ह मराठी’वर  

दख्खनचा राजा जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा

जोतिबा (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज रविवार दि.१८ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी तीन पाकळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. केदार विजय ग्रंथावर आधारीत माहीत अशी आहे की, या नवरात्र सोहळ्याला पौराणिक… Continue reading दख्खनचा राजा जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा

महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत : लाईव्ह मराठी नवदुर्गा महती – भाग १ (व्हिडिओ)

शारदेय नवरात्रानिमित्त ‘लाईव्ह मराठी’च्या माध्यमातून जाणून घेऊया कोल्हापुरातील पुरातन नवदुर्गांची महती अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याकडून.  

तुळशी परीसरात नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने

धामोड (सतीश जाधव) : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट होत आहे. असे असले तरीही निष्काळजीपणा करून चालणार नाही. याचमुळे यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. याचाच एक भाग म्हणून, राधानगरी तालुक्यातील तुळशी परीसरातील तळगाव-महालक्ष्मी, आपटाळ-भावेश्वरी, केळोशी बुद्रुक-रासाई, बुरंबाळी (देऊळवाडी)-भराडी, केळोशी खुर्द-जोतिबा, धामोड-भानोबा, कोते-आंबाबाई, चांदे-जोतिबा ही प्रमुख गावे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या… Continue reading तुळशी परीसरात नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने

आई अंबाबाई, लवकर कोरोना जाऊ दे, तुझं दर्शन होऊ दे..! (व्हिडिओ)

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात आजपासून प्रारंभ झालाय. यानिमित्त जगन्मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची अनुपस्थिती मनाला चटका लावून गेलीय. ‘लाईव्ह मराठी’चा खास रिपोर्ट…  

error: Content is protected !!