कोल्हापुरातील ऑनर किलिंग खटल्यातील साक्षीदार-सरकारी वकिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील आंतरजातीय विवाह केलेल्या मेघा पाटील आणि इंद्रजीत कुलकर्णी यांचा ऑनर किलिंग झाले होते. काल (शनिवार) ऑनर किलिंग करणारे मेघाचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या प्रकरणात कायदेशीर लढाईमध्ये योगदान देणारे वकील विवेक शुक्ल, साक्षीदार वंदना माधव, राहुल गुरव आणि पंच दिलदार मुजावर यांचा सत्कार आज संविधानाची प्रत आणि पुष्प देऊन… Continue reading कोल्हापुरातील ऑनर किलिंग खटल्यातील साक्षीदार-सरकारी वकिलांचा सत्कार…

अखेर कल्याणीच्या ‘प्रेमाची भाकरी’चे स्वप्न अधुरेचं…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तुझ्यात जीव रंगला यासह अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा काल दुर्देवी अपघाती मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली रस्त्यावर होलोंडी येथील खाऊ गल्लीमध्ये ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हॉटेल कल्याणीने पंधरा दिवसांपूर्वीच सुरु केले होते. परंतु, तिचे ‘प्रेमाची भाकरी’चे स्वप्न अधुरेच राहीले. कल्याणीने आपला वाढदिवस ६ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरा केला… Continue reading अखेर कल्याणीच्या ‘प्रेमाची भाकरी’चे स्वप्न अधुरेचं…

दत्त दालमिया ठिय्या आंदोलन : ‘आप’चा पाठिंबा

वारणा (प्रतिनिधी) : जय शिवराय किसान संघटनेचे विविध मागण्यांबाबत आसुर्ले पोर्ले येथील दत्त दालमिया शुगर कारखान्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आज (शनिवार) सहाव्या दिवशी आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला. यावेळी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी, दोन दिवसांमध्ये कारखाना प्रशासनाने जर तोडगा काढला नाही, तर सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या आंदोलनामध्ये सक्रिय… Continue reading दत्त दालमिया ठिय्या आंदोलन : ‘आप’चा पाठिंबा

कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा दिल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने उपसचिव का.गो.वळवी यांनी दिला आहे. यामध्ये श्री गजानन महाराज मंदिर (खोतवाडी, ता. हातकणंगले),  ग्रामदैवत श्री संतुबाई देवालय (हेरवाड, ता. शिरोळ), श्री जुगाईदेवी मंदिर, (येळवण जुगाई, ता. शाहूवाडी), श्री क्षेत्र अंबाबाई देवालय (राधानगरी),  श्री पार्वती मंदिर (वडणगे, ता.… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त…

चंद्रकांतदादांनी घेतले सारथीतंर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई (प्रतिनिधी) :  छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा… Continue reading चंद्रकांतदादांनी घेतले सारथीतंर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय…

दत्तवाड येथील एका बियर बारवर हाणामारी : एक गंभीर

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे असणाऱ्या एका बारवर झालेल्या हाणामारी झाल्याची चर्चा दत्तवाडसह घोसरवाड परिसरात सुरू आहे. या हाणामारीत एक गंभीर तर दोघेजण किरकोळ जखमी झाले असून इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाची साधी माहितीही पोलिसांना नसल्याने कायदा हातात घेऊ पाहणाऱ्यावर कारवाई होणार का ? असा सवाल… Continue reading दत्तवाड येथील एका बियर बारवर हाणामारी : एक गंभीर

अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुश्रीफ फौंडेशनची मदत

जठारवाडी (प्रतिनिधी) : पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबियाना आ. हसन मुश्रीफ फाउंडेशनने दिलासा दिला. फाउंडेशनचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी या आठही कुटुंबांना भेटी देऊन प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदतीचे धनादेश दिले. एक आठवड्यापूर्वी आ. मुश्रीफ यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांनी… Continue reading अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मुश्रीफ फौंडेशनची मदत

रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांना आ. मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप…

कागल (प्रतिनिधी) : कागल येथील रमाई आवास योजनेच्या ५५ घरकुलधारकांना आमदार हसन मुश्रीफ  यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप झाले. त्याबद्दल आ. मुश्रीफ यांचा घरकुलधारकांच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महात्मा फुले वसाहत, दावने वसाहत, श्री. गहिनीनाथ नगर, संत रोहिदास चौक, माळभाग वड्डवाडी, श्री. शाहूनगर बेघर वसाहत, मातंग वसाहत, राजीव गांधी वसाहत येथील रहिवाशांचा… Continue reading रमाई आवास योजनेच्या घरकुलधारकांना आ. मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप…

आ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून तरूणावर मोफत शस्त्रक्रिया

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील सागर लक्ष्मण पाटील (वय ३२) या तरूणावरती मुंबई येथे मोफत (टोटल हिप रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी सुमारे ९ लाख ५० हजार रुपये खर्च झाला. आ. डॉ.विनय कोरे यांच्या प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सागरची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची वडील वारल्यानंतर आई व अपंग बहीणीची संपूर्ण जबाबदारी सागर वरतीच होती.… Continue reading आ. विनय कोरे यांच्या प्रयत्नातून तरूणावर मोफत शस्त्रक्रिया

निगवे खालसातील नृसिंह सरस्वती मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. निगवे खालसा येथे १९८० च्या दरम्यान स्थापन झालेल्या नृसिंह सरस्वती मंदिरात जयंती उत्साहात साजरी होते.… Continue reading निगवे खालसातील नृसिंह सरस्वती मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा

error: Content is protected !!