महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मींनी दिली रंकाळा सुशोभीकरण कार्यस्थळी भेट

कोल्हापूर : रंकाळा तलाव इथं सुरु असलेल्या या कामाची बुधवारी दुपारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अचानक कार्यस्थळी  जाऊन तपासणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी ठेकेदारामार्फत पुर्ण क्षमतेने कामे सुरु नसल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर कामावर ठेकेदाराचे कोणीही कामगार उपस्थित नव्हते. याठिकाणी कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रशासकांनी नाराजी व्यक्त करुन ही कामे दिलेल्या मुदतीत पुर्ण करण्याच्या सूचना… Continue reading महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मींनी दिली रंकाळा सुशोभीकरण कार्यस्थळी भेट

भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. सुनील छेत्रीने आज १६ मे रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. सुनील छेत्रीच्या निवृत्तीमुळे भारतीय… Continue reading भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू सुनिल छेत्रीची निवृत्ती…

‘या’साठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी मान्सून पूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिल्या. मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व संबंधित विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्सून काळात पडणारा पाऊस, संभाव्य पूरस्थिती, अचानक पडणाऱ्या वीजा आणि इतर आपत्तींचे व्यवस्थापन… Continue reading ‘या’साठी मान्सूनपूर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी

कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त वेदनादायी : मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी) : इस्रायल-हमास संघर्षात सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे वैभव अनिल काळे यांचा मृत्यू झाला आहे. वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त अतिशय वेदनादायी असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ना. चंद्रकांत पाटील यांनी, वैभव काळे यांनी भारतीय लष्करात अनेक मोहिमांमध्ये… Continue reading कर्नल वैभव काळे यांना वीरमरण आल्याचे वृत्त वेदनादायी : मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या 319 भाविकांचे लसीकरण..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणार्‍या 319 भाविकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुविधा अ‍ॅपची निर्मिती केली आहे, अशी माहिती राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली. मुस्लिम धर्मियामध्ये हज यात्रेला विशेष महत्त्व असून ही यात्रा पवित्र असल्याची भाविकांमध्ये धारणा आहे. हजमध्ये गेल्यानंतर भाविकांना कोणत्याही अडचणी… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या 319 भाविकांचे लसीकरण..

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री, भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. राजमाता माधवी राजे शिंदे यांचे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. माधवी राजे शिंदे या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. उद्या (गुरुवार) त्यांचे पार्थिव ग्वाल्हेरला आणले जाणार असून तिथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगितले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राजमाता… Continue reading केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक…

गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले कर्नल वैभव अनिल काळे (वय 46) यांचे गाझामधील एका हल्ल्यात निधन झाले आहे. वैभव काळे हे मूळचे नागपुरमधील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून वैभव काळे कार्यरत होते. गेल्या वर्षी गाझामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा… Continue reading गाझामधील हल्ल्यात कर्नल वैभव काळे शहीद…

अभिनेता सलमान खानला एका अटीवर माफी देणार : बिष्णोई समाजाचे स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई अभिनेता सलमान खानच्या मागे हात धुवून लागली आहे. १९९८ साली केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानला अजूनही माफ केलेले नाही. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी या राहत्या अपार्टमेंटवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळंसलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बिष्णोई समाज एका अटीवर सलमानला माफ करु शकतो असं समाजाच्या… Continue reading अभिनेता सलमान खानला एका अटीवर माफी देणार : बिष्णोई समाजाचे स्पष्टीकरण

मातृदिन स्पेशल : आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी..!

कोल्हापूर (असित बनगे) : ‘आ’ म्हणजे आत्मा ‘ई’ म्हणजे ईश्वर. देव काही स्वतः प्रत्येकाजवळ येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली असे म्हटले जाते. आज १२ मे जागतिक मातृदिन…आईची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही. तिचं नुसत असणंच सर्वकांही असते. मुलं जेंव्हा पहिल्यांदा कोणता शब्द उच्चारत असेल तर तो म्हणजे आई… एका आईचही विश्व… Continue reading मातृदिन स्पेशल : आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी..!

मुरगूडमध्ये तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत विद्यार्थ्यांनी साकाराला स्नेह मेळावा…

मुरगूड (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या युगात एकमेकांना वेळ देणे, हितगुज साधणे कठीण झाले आहे. अशातच मुरगूड विद्यालयाच्या सन 2000 ते 2001 च्या बॅचने आज (रविवार) स्नेह मेळावा आयोजित केला होता. तब्बल दोन तपाच्या म्हणजे 24 वर्षांनी एकत्र आलेल्या तरुण आणि तरुणींना अगदी बालपणाची आठवण, शाळेच्या शिक्षकांनी दिलेले संस्कार याची आठवण काढली. तसेच यांच्या उपकारातून उतराई… Continue reading मुरगूडमध्ये तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत विद्यार्थ्यांनी साकाराला स्नेह मेळावा…

error: Content is protected !!