पदवीधरच्या निवडणुकीसंबंधी ‘त्यांनी’ घेतला मोठा निर्णय

पुणे (प्रतिनिधी) : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी मतदानाविरोधात एल्गार पुकारला आहे. या निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचे नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केले आहे. मागील दहा वर्षांत पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर… Continue reading पदवीधरच्या निवडणुकीसंबंधी ‘त्यांनी’ घेतला मोठा निर्णय

मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालत आणीबाणी लादण्याऐवजी नागरिकांनी स्वत:वरच काही बंधने घालून घ्यावीत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केले. पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र, अलीकडे लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण… Continue reading मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही : मुख्यमंत्री

मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र, आपण काळजी घेणे गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणण्यापेक्षा आपणच त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. दिवाळीनंतर नियमावली तयार करून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन दिली. ते म्हणाले,… Continue reading मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना जीवे मारण्याची धमकी

पणजी (वृत्तसंस्था) : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे खंडणीची मागणी करून त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये त्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणी पणजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर पासून मुख्यमंत्री सावंत यांना मोबाइलवर अज्ञातांकडून धमकीचा  मेसेज येत आहे.… Continue reading गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना जीवे मारण्याची धमकी

पुढील महापौर शिवसेनेचा ! : राजेश क्षीरसागर (व्हिडिओ)

कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना पुढील महापौर शिवसेनेचा होणार, असा निर्धार व्यक्त केला.  

‘पुणे पदवीधर’मधून संभाजी ब्रिगेडतर्फे मनोजकुमार गायकवाड लढणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उद्योजक मनोजकुमार गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि प्रदेश संघटक डॉ. सुदर्शन तारख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, पुणे-सोलापूर येथील तरुण उद्योजक इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक विद्यार्थी प्रश्न तसेच शिक्षक… Continue reading ‘पुणे पदवीधर’मधून संभाजी ब्रिगेडतर्फे मनोजकुमार गायकवाड लढणार…

‘पुणे पदवीधर’साठी वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षातून प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे झालेल्या मेळाव्यात केली आहे. त्यामुळे तशी तयार पूर्ण झाली असून, वंचित बहुजन आघाडी पक्ष पूर्ण ताकदीने पुणे पदवीधर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आज (शनिवार) उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे आणि जिल्हा अध्यक्ष… Continue reading ‘पुणे पदवीधर’साठी वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी

माजी आमदार राजीव आवळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

टोप (प्रतिनिधी) : जनसुराज्य पक्षाकडून सन २००४ ला आमदार झालेले राजीव किसन आवळे यांना गत विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी चांगली मतेही घेतली होती. यानंतर ते कुठे जाणार, अशी चर्चा होती. पण सध्या ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे हा… Continue reading माजी आमदार राजीव आवळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

‘गडहिंग्लज’ पंचायत समितीसाठी ‘नावीन्यपूर्ण’ निधीची मागणी

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजची पंचायत समिती नेहमीच यशवंत पंचायत राज अभियानामध्ये अग्रेसर आहे. तालुक्यामध्ये अनेक नावीन्यपूर्ण योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जातात. नुकतीच प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण सन्मान दालन व अभ्यागत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इतर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गडहिंग्लज पंचायत समितीला भरघोस निधी उपलब्ध करून देण्याची… Continue reading ‘गडहिंग्लज’ पंचायत समितीसाठी ‘नावीन्यपूर्ण’ निधीची मागणी

गोव्याच्या नगरविकास मंत्र्यांनी घेतली शारंगधर देशमुख यांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोवा मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्या निवासस्थानी आज (शुक्रवार) सदिच्छा भेट दिली. साळगावकर यांचे स्वागत व सत्कार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रविण केसरकर, अमर जाधव, संजय कळकुठकर, संदेश हाजपळकर, सुहारसिंग राणे, जिला पेढणेकर, किरण पाटील… Continue reading गोव्याच्या नगरविकास मंत्र्यांनी घेतली शारंगधर देशमुख यांची भेट…

error: Content is protected !!