विधानपरिषदेसाठी राजेश क्षीरसागर यांचे नाव चर्चेत !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी इच्छुकांची यादी अंतिम करण्याच्या घडामोडी पक्षीय पातळीवर वेगावल्या आहेत. शिवसेनेकडून शहरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. यामुळे शहरातील शिवसैनिकांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षातर्फे राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठीची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे.… Continue reading विधानपरिषदेसाठी राजेश क्षीरसागर यांचे नाव चर्चेत !

पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळेच आंदोलन स्थगित : भूपाल शेटे (व्हिडिओ)

घरफाळा घोटाळ्याप्रकरणी संजय भोसले यांच्या निलंबनासाठी सुरु असलेले आमरण उपोषण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आश्वासनानुसार स्थगित केल्याचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी सांगितले.  

सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही : राज ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. पण प्रश्न सोडविण्याबाबत निर्णय घेण्याची कमतरता सरकारकडे आहे. आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?, असा सवाल करत सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सरकारचे वाभाडे काढले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी… Continue reading सरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही : राज ठाकरे

‘यावर’ शरद पवारांशी बोला ; राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला

मुंबई (प्रतिनिधी) : गेली अनेक दिवस माझा पक्ष, कार्यकर्ते वाढीव वीज बिलांविरोधाच आंदोलन करत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (गुरूवार) भेट घेतली, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलत सांगितले. राज ठाकरे म्हणाले की, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ सांगितले. पण अजून… Continue reading ‘यावर’ शरद पवारांशी बोला ; राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला

शुगर वाढली की, काय बोलतोय ते नारायण राणेंनाच कळत नाही

रायगड (प्रतिनिधी) : दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जिव्हारी लागलेल्या टीकेला उत्तर देताना नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. यावर शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर देताना बीपी, शुगर वाढली की, काय आणि कसं बोलतात हे नारायण राणेंनाच कळत नाही, अशा… Continue reading शुगर वाढली की, काय बोलतोय ते नारायण राणेंनाच कळत नाही

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच कोट्यवधींचा निधी परत गेला : हेमंत कोलेकरांचा आरोप (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील प्रलंबित, अपुऱ्या पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीकडे चार कोटींचा निधी आला होता. मात्र, सत्ताबदल झाल्यानंतर पूर्वीच्या याद्या बदलण्याच्या घोळात हा सर्व निधी परत गेला. सत्ताधाऱ्यांनी हा निधी मिळविण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही. यामुळे जिल्हा जलव्यवस्थापनाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप सदस्य हेमंत कोलेकर यांनी केला आहे. ते आज (बुधवार)… Continue reading सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच कोट्यवधींचा निधी परत गेला : हेमंत कोलेकरांचा आरोप (व्हिडिओ)

निलंबन केल्याशिवाय उपोषण मागे नाही : भूपाल शेटे (व्हिडिओ)

घरफाळा घोटाळाप्रकरणी संजय भोसलेंवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणारा नाही. असा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिला.  

राजू शेट्टी पुन्हा रूग्णालयात दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल झाले आहेत. रक्तदाब वाढल्याने ते उपचारासाठी दाखल झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. गेले दोन दिवस ते दिल्लीत शेतकरी प्रश्नासाठीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी ते पुण्यात आले. नेहमीच्या… Continue reading राजू शेट्टी पुन्हा रूग्णालयात दाखल

‘हा’ त्याच एका कटकारस्थानाचा भाग : चंद्रकांत पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : आपण सर्व भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा समजते की काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते आणि आताही द्यायचे नाही. सुनावणीदरम्यान वकील उपस्थित नसणे, हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे. परंतु जनता सुजाण आहे, ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.… Continue reading ‘हा’ त्याच एका कटकारस्थानाचा भाग : चंद्रकांत पाटील

मुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा  

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो. आता  लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता लवकरच आम्ही मराठी तुला थोबडवनार, अशी धमकी मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला दिली आहे. बिग बॉसच्या १४ व्या पर्वात जान कुमार सानूने मराठी… Continue reading मुंबईत तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो : खोपकरांचा गायक पुत्राला इशारा  

error: Content is protected !!