राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर : एकेक मताला महत्त्व

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख तोंडावर आली असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडमोडी सुरू आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी एक-एक मताला महत्त्व आले आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपला दोन जागा मिळणार हे निश्चित आहे. पण भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने महाविकास… Continue reading राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर : एकेक मताला महत्त्व

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सारखा एकही आमदार देशात सापडणार नाही : खा. शरद पवार

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरात छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा व्हावा, यासाठी पुढाकार घेणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी यांच्या वतीने ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ देऊन शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी खा. शरद पवार यांनी, हसन मुश्रीफ सारख्या इतक्या धडाडीनं काम करणारा एकही आमदार महाराष्ट्रातच नव्हे, तर… Continue reading ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सारखा एकही आमदार देशात सापडणार नाही : खा. शरद पवार

शिरोली, टोप, संभापूर, कासारवाडी ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर…

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप, शिरोली, संभापूर आणि कासारवाडी येथील ग्रा.पं. च्या प्रभागांचे आरक्षण विशेष सभेत जाहीर करण्यात आले. यामध्ये आरक्षण सोडत करण्यात आली. तर काही भागातील आरक्षण लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी उचलून काढण्यात आले. या चारही गावातील प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता लवकरच निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. ग्रा.पं.चे प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे… Continue reading शिरोली, टोप, संभापूर, कासारवाडी ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर…

राज्यसभेसाठी ना. सतेज पाटील यांची पडद्यामागून राजकीय खेळी…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीत भाजपने माजी खा. धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने सहावी जागा महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील पडद्यामागे राहून राजकीय खेळी खेळत असल्याची चर्चा होत आहे. कोल्हापूरचे राजकारण गेल्या काही वर्षांत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्याभोवतीच फिरत आलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, गोकुळ दूधसंघ ते अलीकडेच झालेली विधानसभेची… Continue reading राज्यसभेसाठी ना. सतेज पाटील यांची पडद्यामागून राजकीय खेळी…

कोल्हापूरसह १४ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे रखडलेल्या रखडलेल्या कोल्हापूरसह १४ महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातील संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ३१ मेपर्यंतची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. १४ नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ’१४ महापालिकांची… Continue reading कोल्हापूरसह १४ महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…

महाविकास आघाडीत आपआपसात धुसफूस सुरूच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये विविध आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार रणधुमाळी सुरु असताना मविआमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. अलीकडेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करताना पाठीत खंजीर… Continue reading महाविकास आघाडीत आपआपसात धुसफूस सुरूच…

संभाजीराजे छत्रपती उद्या रायगडवरून आपल्या भावना मांडणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या दाबून ठेवलेल्या भावनांना उद्या ६ जून रोजी किल्ले रायगडवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात वाट करून देणार असल्याचे समजते. संभाजीराजे छत्रपती यांनी मागील महिन्यात स्वराज्य या नावाची संघटना स्थापन केल्याची घोषणा केली होती. सोबतच ही संघटना भविष्यात राजकीय पक्ष देखील होऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले. यावेळी… Continue reading संभाजीराजे छत्रपती उद्या रायगडवरून आपल्या भावना मांडणार…

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर…

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे येत्या १० जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसेना नेते, आमदार अयोध्येला जाणार होते.… Continue reading आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर…

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण…

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती फडणवीसांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. अलीकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला. हा दौरा रद्द करून फडणवीस हे मुंबईत… Continue reading देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण…

दिलीप पाटील यांची ‘आप’च्या कोल्हापुर जिल्हा सचिवपदी निवड…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या जिल्हा सचिवपदी दिलीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य बैठकीत हे निवडीचे पत्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी दिले. दिलीप पाटील हे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आणी प्रगत संगणकामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी संशोधन विकास आणी प्रोजेक्ट प्रोग्राम मँनेजर म्हणून सिम्बियन, लंडन, नोकिया, बंगलोर येथे काम केले… Continue reading दिलीप पाटील यांची ‘आप’च्या कोल्हापुर जिल्हा सचिवपदी निवड…

error: Content is protected !!