पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द

बोरपाडळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पैजारवाडी (ता.पन्हाळा) येथील प. पू. सदगुरू चिले महाराज समाधी मंदिर येथे होणारा भंडारा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी पैजारवाडी येथील सदगुरू चिले महाराज यांच्या कासवाकृती मंदिरात भंडारा महोत्सव आयोजित केला जातो. यावेळी आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमास हजारो भक्तांची गर्दी… Continue reading पैजारवाडी येथील चिले महाराज मंदिरातील भंडारा महोत्सव रद्द

श्री जोतिबा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. देवाचा पालखी सोहळा २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होणार आहे. मात्र या मानकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय आज (शुक्रवार) जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. विनय कोरे आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरवर्षी लाखो भक्तांच्या… Continue reading श्री जोतिबा पालखी सोहळा होणार २१ मानकऱ्यांच्या उपस्थितीत…

शहापूरची म्हसोबा देवस्थान यात्रा भाविकांसाठी रद्द…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहापूरचे ग्रामदैवत व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री म्हसोबा देवाची यात्रा पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांसाठी रद्द करण्यात आली आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी मोजक्याच लोकांच्या आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. कोरोना महामारी व वाढती रुग्णसंख्या या सर्व गोष्टींचा विचार करून शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव… Continue reading शहापूरची म्हसोबा देवस्थान यात्रा भाविकांसाठी रद्द…

निवृत्ती मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून विविध कार्यक्रम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील ब्रह्मेश्वर बागेतील निवृत्ती तरुण मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १० ते १२ मार्च या कालावधीत ब्रह्मेश्वर मंदिर येथे हे कार्यक्रम होतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय शेळके यांनी दिली. शेळके यांनी सांगितले की, १० मार्च रोजी रात्री ९ वाजता वेताळ देवाचे भजन होणार आहे. ११ रोजी सकाळी साडेसात वाजता… Continue reading निवृत्ती मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून विविध कार्यक्रम…

भाविकांसाठी यंदा गडहिंग्लजची काळभैरी यात्रा रद्द..!

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे ग्रामदैवत आणि पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या काळभैरीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे भाविकांसाठी रद्द करण्यात आली. मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असून याचे थेट प्रक्षेपण भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कुणालाही यात्रा काळात १ किलोमीटर पर्यंतच्या मंदिर परिसरात अजिबात सोडले जाणार नसल्याची माहिती प्रांताधिकारी… Continue reading भाविकांसाठी यंदा गडहिंग्लजची काळभैरी यात्रा रद्द..!

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत उद्यापासून बदल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. दररोज दुपारी १२ ते  ३ वेळेत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय आज (बुधवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. जाधव यांनी सांगितले की, मिशन अनलॉक अंतर्गत… Continue reading करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शन वेळेत उद्यापासून बदल

आता श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देवस्थान समिती कठोर निर्णय घेणार : महेश जाधव (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुन्हा एकाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढत असून काही भक्त नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची बैठक घेऊन देवीच्या दर्शनासाठी कठोर निर्णय घेण्यात येईल, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.… Continue reading आता श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देवस्थान समिती कठोर निर्णय घेणार : महेश जाधव (व्हिडिओ)

श्री हेडमाळशिद देवाच्या पालखी दर्शनासाठी टोप येथे भाविकांची गर्दी…

टोप (प्रतिनिधी) : अब्दुललाट येथील श्री हेडमाळशिद देवाची पालखी भक्तांच्या भेटीसाठी नावली या गावातून ३५ किमीवरील टोप (ता. हातकणंगले) येथील कृष्णात सिसाळ या भक्तांच्या घरी आली. या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या देवाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, काही कारणाने भक्तांना देवाकडे जाण्यासाठी वेळ लागतो यामुळे देवच स्वत: भक्तांच्या भेटीसाठी ज्या त्या गावात… Continue reading श्री हेडमाळशिद देवाच्या पालखी दर्शनासाठी टोप येथे भाविकांची गर्दी…

अखेर सौंदत्तीतील श्री रेणुकादेवीचे मंदिर खुले…

बेळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांपासून बंद असलेले सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवीचे मंदिर आजपासून (सोमवार) खुले करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्याने मंदिर खुले करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. कर्नाटकातील इतर मंदिरे ८ जून २०२० रोजीच सुरू करण्यात आली होती,  पण सौंदत्ती… Continue reading अखेर सौंदत्तीतील श्री रेणुकादेवीचे मंदिर खुले…

एकाच महिन्यात दोनवेळा ‘संकष्टी चतुर्थी’चा योग..!

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (३१ जानेवारी) आहे. जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. पहिली संकष्टी चतुर्थी २ जानेवारीला होती. तर दुसरी चतुर्थी आज ३१ जानेवारीला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी पर्वणी असणार आहे. सामान्यपणे संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेतात. तर काही जण या दिवशी उपवास ठेवतात. कोरोना… Continue reading एकाच महिन्यात दोनवेळा ‘संकष्टी चतुर्थी’चा योग..!

error: Content is protected !!