व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५  रुपयांची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना केंद्र सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. आज १ नोव्हेंबरपासून एलपीजी गॅस सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे ठेवण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या… Continue reading व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५  रुपयांची कपात

दोन तासांनी व्हॉट्सअॅपचे ग्रहण सुटले

मुंबई (प्रतिनिधी) : भारतासह जगभरातील अनेक देशांत मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपची सेवा जवळपास दोन तास ठप्प झाली होती. व्हॉट्सअॅपची सेवा दुपारी १२.३० च्या सुमारास विस्कळीत झाली. जवळपास दीड तासानंतर दुपारी २ वाजून ६ मिनिटांनी ती पुन्हा पूर्ववत झाली. सरकारने व्हॉट्सअ‍ॅपची पॅरेट कंपनी मेटाकडून या गडबडीचा अहवाल मागवला आहे. यामुळे कोट्यवधी लोकांचे नुकसान झाले आहे. जगभरात व्हॉट्सअॅप सेवा… Continue reading दोन तासांनी व्हॉट्सअॅपचे ग्रहण सुटले

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात अवघ्या २२ तासात साखर उत्पादन सुरू

बेलेवाडी (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा आठवा गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्याने ऊस गाळप सुरू केल्यापासून अवघ्या २२  तासात साखर उत्पादन व्हावयास सुरुवात केली असून या हंगामात उत्पादित पहिल्या सात साखर पोत्यांचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी मुश्रीफ म्हणाले या हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपासह सहवीज प्रकल्पातून नऊ कोटी… Continue reading सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात अवघ्या २२ तासात साखर उत्पादन सुरू

महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावलीचे औचित्य साधून महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शनास नागरिकांचा तालुका, प्रभाग व गावस्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, कोल्हापूरतर्फे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खाद्य पदार्थ उत्पादन करणारे स्वयंसहायता समूह सहभागी असून, दीपावलीचे फराळ मोठया प्रमाणात विक्री… Continue reading महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू विक्रीस उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, २८० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख, १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४०९ कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.  महाविकास… Continue reading जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप

साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे : आ. बाळासाहेब पाटील

साळवण (प्रतिनिधी) : निर्यात साखर विक्रीची कोटा पध्दत रद्द करुन खुल्या पध्दतीने साखर निर्यातीस परवानगी मिळावी. केंद्राने साखरेचा ‍किमान हमीभाव ३५ रुपये करावा. साखर कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल निर्मितीकडे वळावे असे मत माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन… Continue reading साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे : आ. बाळासाहेब पाटील

गुंजेगाव येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील विजया महिला दूध संस्थेच्या गोकुळच्‍या क्लस्टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्ते तसेच सोलापूर विधानपरिषदचे माजी आ. प्रशांत परिचारक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाले. यावेळी प्रशांत परिचारक म्‍हणाले, १५ हजार लिटर्स क्षमतेच्या या बल्‍क कुलरमुळे मंगळवेढा परिसरातील संपूर्ण दूधाचे याठिकाणी संकलन… Continue reading गुंजेगाव येथे गोकुळच्या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलरचे उद्घाटन

शाश्वत अर्थचक्रामध्ये दुग्ध व्यवसायाचे प्रमुख योगदान : डॉ. चेतन नरके

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाने शाश्वत अर्थचक्रामध्ये मोठे  योगदान दिले असल्याचे प्रतिपादन डॉ. चेतन नरके यांनी केले. पुणे येथे आयोजित दूध परिषदेत “डेअरी उद्योगातील शाश्वत अर्थचक्र’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  ते म्हणाले, भारतामध्ये हजारो वर्षांपासून पशुधनाच्या माध्यमातून एक शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. समाजव्यवस्था, लोकजीवन, लोकसंस्कृती, पर्यावरण, अर्थकारण,… Continue reading शाश्वत अर्थचक्रामध्ये दुग्ध व्यवसायाचे प्रमुख योगदान : डॉ. चेतन नरके

‘इंटेल’, ‘बायजू’ कंपनीमध्ये होणार मोठी कर्मचारी कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात आर्थिक मंदीचे सावट गडद होत आहे. अशात बऱ्याच बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु झाली आहे. याचाच भाग म्हणजे एका मोठ्या कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रातील इंटेल कंपनी जवळपास २० टक्के कर्मचारी कमी करणार आहे. यात सेल्स, मार्केटिंग आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिवाळी तोंडावर… Continue reading ‘इंटेल’, ‘बायजू’ कंपनीमध्ये होणार मोठी कर्मचारी कपात

घोरपडे कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू : आ. मुश्रीफ

बेलेवाडी काळम्मा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचे श्रममंदिर असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू, असा विश्वास संस्थापक व आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गेल्या हंगामाच्या उताऱ्यावर आधारीत यावर्षीही एकरकमी एफआरपी देणार, असा पुनरुचारही त्यांनी केला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाच्या प्रारंभात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी… Continue reading घोरपडे कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू : आ. मुश्रीफ

error: Content is protected !!