इलेक्ट्रिकल मोटरी, दुचाकी, सोलर साहित्य चोरट्यांच्या मुसक्या इस्पुर्ली पोलिसांनी आवळल्या..!

( दिंडनेर्ली प्रतिनिधी कुमार मेटील ) गेल्या अनेक दिवसांपासून इस्पुर्लीसह पंचक्रोशीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतातील इलेक्ट्रिकल मोटरी, सोलर साहित्य, जून्या दुचाकी गायब करणे सुरु केले आहे. या संदर्भात स्थानिक नागरीकांनी आपले साहित्य गायब होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी यंत्रणा वेगवान केली असता या चोऱ्यांमध्ये सामिल असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात इस्पुर्ली पोलिसांना… Continue reading इलेक्ट्रिकल मोटरी, दुचाकी, सोलर साहित्य चोरट्यांच्या मुसक्या इस्पुर्ली पोलिसांनी आवळल्या..!

डॉक्टरांकडून मृत रुग्णाच्या आईला मारहाण ; निलंबनाची मागणी

यवतमाळ : आपल्याकडे डॉक्टरांना देवच दुसरं रूप मानलं जात. मृत्यूच्या दारातून रुग्णांना बाहेर काढण्याचं काम डॉक्टर करतात. त्यामुळे, गावोगावी आजही डॉक्टरांना समाजात मानाचे स्थान दिले जाते. परंतु काही डॉक्टरांच्या कृतीमुळे चांगले डॉक्टर बदनाम झाल्याचं पाहायला मिळतंय. कोराना कालावधीत तर रुग्णांची  वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लुट झाली. त्यामुळे हे क्षेत्र वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यवतमाळ  जिल्ह्यात… Continue reading डॉक्टरांकडून मृत रुग्णाच्या आईला मारहाण ; निलंबनाची मागणी

शेडशाळमधील शेतकरी आत्महत्याप्रकरणी पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शेडशाळ (ता. शिरोळ) येथील शेतकरी आत्महत्याप्रकरणी पाच खासगी सावकारांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रविकांत धनपाल जगताप, चंद्रकांत धनपाल जगताप (दोघे रा. कवठेगुलंद), बाबू आप्पासो नाईक, विजय पापा नाईक आणि महादेव गणू नाईक (सर्व रा. शेडशाळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत. यापैकी चंद्रकांत जगताप याला पोलिसांनी चौकशसाठी ताब्यात घेतले… Continue reading शेडशाळमधील शेतकरी आत्महत्याप्रकरणी पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल…

आवाडे समर्थकावर इचलकरंजीत कोयत्याने वार

इचलकरंजी : क्रिकेटच्या जुन्या वादातून दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पाठलाग  करून एका दिवाणजीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरज अशोककुमार राठी (वय 32, रा. नारायण पेठ) असे जखमी युवकाचे नाव असून तो आवाडे समर्थक कार्यकर्ता आहे. याप्रकरणी प्रणव माणकर, समर्थ राजकुमार जाधव (दोघे रा. इचलकरंजी) या दोघांना शिवाजीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.… Continue reading आवाडे समर्थकावर इचलकरंजीत कोयत्याने वार

‘त्या’ दुर्घटनेत एकुलता एक कमावणारा आधार गेला

मुंबई : घाटकोपरमध्ये काल काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. अचानक आलेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मोठी तारंबळ उडाली होती. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये एक अवाढव्य होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत  आतापर्यंत 14 जणांचा  मृत्यू झाला आहे. पेट्रोल पंपावर  पेट्रोल भरायला गेलेल्या भरत राठोड नामक एका 24 वर्षीय तरुणावर याठिकाणी काळाने घाला घातला.   भरत राठोड… Continue reading ‘त्या’ दुर्घटनेत एकुलता एक कमावणारा आधार गेला

सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कुरुंदवाड :  शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय 44) या शेतकऱ्याने शेतातील गोठ्याच्या शेडमध्ये गळफास  घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. मृत भालचंद्र यांच्या खिशातून पोलिसांना एक चिट्ठी मिळाली आहे. त्यामध्ये  सावकारांची नावे असून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख आहे. तसेच सावकारांच्‍या… Continue reading सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

इचलकरंजीत एकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून

इचलकरंजी : येथील गणेशनगरमधील राकेश धर्मा कांबळे (वय 32) या तरुणाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.इचलकरंजीतील  टोळक्याने पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून राकेश कांबळे याचा खून केला. ही घटना पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. राकेश हा अत्याधुनिक यंत्रमागावर काम करीत होता.… Continue reading इचलकरंजीत एकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून

संतोष कदम खून प्रकरणी न्यायालयात पाच आरोपींवर दोषारोप पत्र दाखल…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी पाच आरोपीं विरोधात जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित सिद्धार्थ बाबा चिपरीकर आणि शाहरुख शेख या दोन आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तर दोन संशयितांना फरार घोषित करून अटक वॉरंट बजावण्यासाठी न्यायालयांकडे पोलिसांनी अर्ज दाखल… Continue reading संतोष कदम खून प्रकरणी न्यायालयात पाच आरोपींवर दोषारोप पत्र दाखल…

कुप्रसिद्ध जर्मनी गँग विरोधात मोक्कांतर्गत कारवाई

कोल्हापूर : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह जिल्हा परिसरातील शरिराविरुध्दच्या व मालाविरुध्दच्या गुन्ह्यांसह अवैध व्यवसायामध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच समाजकंटक गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करुन सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक लाभासह इतर लाभ संपादन करण्यासाठी  गुन्हे करणा-या गुन्हेगार व टोळ्यांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम… Continue reading कुप्रसिद्ध जर्मनी गँग विरोधात मोक्कांतर्गत कारवाई

खासगी सावकारीतून नागावच्या तरुणाला बेदम मारहाण…

टोप (प्रतिनिधी) : शिरोली पुलाची येथील खासगी सावकारांसह दोघानी नागाव येथील एकाला अर्धनग्न करून मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर सुधाकर समुद्रे (वय ३७) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील नागांव येथील सागर सुधाकर समुद्रे याला खासगी सावकार वैभव माजगावकर, धनाजी गुरव (रा. पुलाची शिरोली… Continue reading खासगी सावकारीतून नागावच्या तरुणाला बेदम मारहाण…

error: Content is protected !!