अंधश्रद्धेवर भाष्य करणारी ‘परीस’ वेबसिरीज ३१ ऑगस्ट रोजी प्लॅनेट मराठीवर 

कोल्हापूर (प्रतिनिधी) :   अंधश्रद्धेवर आधारित ‘परीस’ ही सस्पेन्स थ्रीलर वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातील बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर  ‘प्लॅनेट मराठी’ने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.  भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून त्यासाठी अनेकदा माणसांचा,… Continue reading अंधश्रद्धेवर भाष्य करणारी ‘परीस’ वेबसिरीज ३१ ऑगस्ट रोजी प्लॅनेट मराठीवर 

यशवंत भालकर फौंडेशनतर्फे ‘नृत्यसंगम २०२१’ ऑनलाईन नृत्यस्पर्धा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर हे कलेचे माहेरघर मानले जाते. त्या परंपरेत सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ पुन्हा नव्याने सुरू व्हावी यासाठी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने यशवंत भालकर फौंडेशन आणि  अरूण नरके फौंडेशन यांच्या सहकार्याने नृत्यसंगम २०२१ ही ऑनलाईन नृत्यस्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा दुहेरी आणि समुह नृत्य अशी स्वरूपात ही स्पर्धा होणार आहे.   भगवान श्री कृष्ण… Continue reading यशवंत भालकर फौंडेशनतर्फे ‘नृत्यसंगम २०२१’ ऑनलाईन नृत्यस्पर्धा…

‘हिंग पुस्तक तलवार’ वेबसिरीज आता  ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर… 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्लॅनेट मराठीच्या ‘सोप्प नसतं काही’ आणि ‘जॉबलेस’ या दोन वेबसिरीज रसिक प्रेकक्षांच्या पसंतीस उतरली होती.  ‘प्लॅनेट मराठी’ आता निपुण धर्माधिकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे, मकरंद शिंदे दिग्दर्शित ‘हिंग पुस्तक तलवार’ ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसिरीज ३१ ऑगस्टपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशीच… Continue reading ‘हिंग पुस्तक तलवार’ वेबसिरीज आता  ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर… 

शर्लिन चोप्रा – राज कुंद्रा यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

मुंबई (प्रतिनिधी) : अश्लील फिल्म, मालिका बनविल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींची चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्राला चौकशीसाठी क्राइम ब्रँचने बोलावले होते. आता शर्लिन चोप्राने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केलाय ज्यामुळे खळबळ माजली आहे. शर्लिन चोप्राने राज… Continue reading शर्लिन चोप्रा – राज कुंद्रा यांचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

अभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर  पुनरागमन करतोय. छोट्या पडद्यावरूनच श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता झी मराठीवरील आगामी मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या… Continue reading अभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन…

चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण नियम पाळूनच करावे : मुख्यमंत्र्यांचे ‘प्रॉंड्यूसर गिल्ड’ला निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही. विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी समन्वय ठेवावा, आपल्या पथकातील कलाकार व इतरांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात… Continue reading चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण नियम पाळूनच करावे : मुख्यमंत्र्यांचे ‘प्रॉंड्यूसर गिल्ड’ला निर्देश

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील भूमिकेचा मला सार्थ अभिमान : अक्षय मुडावदकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील सध्या प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघायला मिळत आहे. तसेच ही भूमिका मला साकारायला मिळाली याचा… Continue reading ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील भूमिकेचा मला सार्थ अभिमान : अक्षय मुडावदकर

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘म मानाचा,  म महानतेचा, म मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. या गाण्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, अभिनेते ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार आणि रंजक झाले आहे. या गीताच लेखन समीर सामंत यांचे… Continue reading ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला….

अलविदा दिलीपकुमार…

कोल्हापूर : (विजय पोवार) :  दिलीपकुमार उर्फ युसुफखान ! अभिनेता, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ट्रॅजेडीकिंग, भारतीय चित्रपटसृष्टीत सुरुवातीपासून चमकणारा हा तेजस्वी तारा आज (बुधवार) वयाच्या ९८ व्या वर्षी निस्तेज होऊन लोप पावला. तत्कालीन हिंदुस्थानमधील पेशावर शहरात जन्मलेला हा युसूफ खान पठाण कुटुंबासमवेत महाराष्ट्रात आला. त्याने मुंबईत नशीब आजमावले आणि भारतीय सिनेमा क्षेत्रावर अधिराज्यही गाजवले.  अभिनयाची उत्तम… Continue reading अलविदा दिलीपकुमार…

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे आज (बुधवार) सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. दिलीपकुमार यांची तब्बेत गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती. हिंदुजा रूग्णालयातच त्यांना याआधी दाखल करण्यात आले होते. आज  सकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेजिडी किंग दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सोबत पत्नी अभिनेत्री सायरा… Continue reading हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे निधन…

error: Content is protected !!