नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा : संजय पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी आज (मंगळवार) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन विधान केले… Continue reading नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा : संजय पवार

इचलकरंजी येथे शिवसेनेकडून ना. नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन…  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधात आज (मंगळवार) शिवसेना इचलकरंजी शहराच्यावतीने मंत्री राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरकार्यालय येथून मोर्च्या काढण्यात आला. तसेच छ. शिवाजी महाराज पुतळा येथे… Continue reading इचलकरंजी येथे शिवसेनेकडून ना. नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन…  

…अन्यथा नारायण राणे यांना कोल्हापूरी हिसका दाखवू : मुरलीधर जाधव

हुपरी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ शिवसेना हुपरी शहर यांच्यावतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हुपरी पोलीस ठाणे येथे नारायण राणे यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. मुरलीधर जाधव… Continue reading …अन्यथा नारायण राणे यांना कोल्हापूरी हिसका दाखवू : मुरलीधर जाधव

ना. नारायण राणे यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर 

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ मुंबई बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ना. नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन, रास्ता रोको, महामार्ग रोको अशा आंदोलनातून शिवसैनिक संताप व्यक्त करीत आहेत. कोल्हापूर शहरात जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शिवसैनिक ऐतिहासिक बिंदू चौकात ना.… Continue reading ना. नारायण राणे यांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शिवसैनिक रस्त्यावर 

मलकापूर येथील वृत्तवाहिनीचे कॅमेरामन प्रमोद सौंदडे यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील वृत्तवाहिनीचे कॅमेरामन प्रमोद तातोबा सौंदडे (वय ३४)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन लहान मुले व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. १२ वर्षांपूर्वी प्रमोद यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीतून कॅमेरामन म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीचा कॅमेरामन म्हणून ते रुजू झाले… Continue reading मलकापूर येथील वृत्तवाहिनीचे कॅमेरामन प्रमोद सौंदडे यांचे निधन

जि.प.मध्ये उद्या विषय समित्यांमधील १४ रिक्त पदांसाठी निवडणूक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील ९ विषय समिती समित्यांमधील १४ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी उद्या (मंगळवार)  सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दुपारी एक वाजता या सभेला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत ही पार पडणार आहे. यामध्ये दुपारी १ ते १.१५ या… Continue reading जि.प.मध्ये उद्या विषय समित्यांमधील १४ रिक्त पदांसाठी निवडणूक

कदमवाडी येथे पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा जागीच मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील कदमवाडी परिसरात असणाऱ्या घाडगे कॉलनी येथे शिवांजली रेसिडेन्सीमधील पाचव्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मंजुषा विनायक कागले (वय ३९) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (रविवार) रात्री उशिरा घडली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, विनायक कागले हे पत्नी, वृध्द आई आणि… Continue reading कदमवाडी येथे पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा जागीच मृत्यू…

चेन हिसकावून पलायन करणाऱ्या चोरट्यास अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात १८ ऑगस्ट २०२१ रोजी कारंडेमळा ते कदमवाडी दरम्यान रस्त्यावर मॉर्निंगवाँकला आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन करणाऱ्या चोरट्यास आज (सोमवार) शिवाजी पेठ-मोरेवाडी दरम्यान अटक करण्यात आली. सागर विश्वास अस्वले (वय ३७ रा. निगवे दुमाला ता.करवीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८१ हजार १२० रुपये किंमतीची सोन्याची… Continue reading चेन हिसकावून पलायन करणाऱ्या चोरट्यास अटक…

कोल्हापूर कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात २१८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २१८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून ३६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३६, आजरा – १, भुदरगड – ३, चंदगड – १, गडहिंग्लज – १२, गगनबावडा – १, हातकणंगले – ३७, कागल – ५,  करवीर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात २१८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

यशवंत भालकर फौंडेशनतर्फे ‘नृत्यसंगम २०२१’ ऑनलाईन नृत्यस्पर्धा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर हे कलेचे माहेरघर मानले जाते. त्या परंपरेत सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ पुन्हा नव्याने सुरू व्हावी यासाठी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने यशवंत भालकर फौंडेशन आणि  अरूण नरके फौंडेशन यांच्या सहकार्याने नृत्यसंगम २०२१ ही ऑनलाईन नृत्यस्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा दुहेरी आणि समुह नृत्य अशी स्वरूपात ही स्पर्धा होणार आहे.   भगवान श्री कृष्ण… Continue reading यशवंत भालकर फौंडेशनतर्फे ‘नृत्यसंगम २०२१’ ऑनलाईन नृत्यस्पर्धा…

error: Content is protected !!