कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ३० जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज (रविवार) दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. १,०७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १७, भूदरगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर… Continue reading कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ३० जणांना कोरोनाची लागण

दुसर्‍या टप्प्यात पत्रकारांना कोरोना लस दया : बाजीराव फराकटे  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीत सर्वच पत्रकारांनी काम केलेले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामुळे काही पत्रकारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पत्रकारदेखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून या काळात होते आणि आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पत्रकारांचेही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार… Continue reading दुसर्‍या टप्प्यात पत्रकारांना कोरोना लस दया : बाजीराव फराकटे  

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे १९ रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १९ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९७७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये, कोल्हापूर शहरातील १७, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,६००.… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे १९ रुग्ण

गांधीनगरच्या वसाहत रुग्णालयात ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे लसीकरण…

  कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना आज (शुक्रवार) कोव्हिडचे लसीकरण करण्यात आले. शासकीय वसाहत रुग्णालयामध्ये ही लस रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विद्या पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरपंच रितू लालवानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. यावेळी डॉ. विद्या पॉल यांनी लसीकरणाबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यावेळी साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी… Continue reading गांधीनगरच्या वसाहत रुग्णालयात ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे लसीकरण…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यातील रुग्ण संख्या ‘चारशे’जवळ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी २८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (गुरुवार) दिवसभरात १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५०९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १३, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यातील रुग्ण संख्या ‘चारशे’जवळ…

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४८ रुग्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) ४८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,३५१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटीव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३२, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४८ रुग्ण

आजऱ्यात कोरोनामुळे एका वृद्धाचा मृत्यू…

आजरा (प्रतिनिधी) : आजऱ्यातील मुख्य बाजारपेठेतील ७२ वर्षीय वृध्द व्यापाऱ्यांचा आज (बुधवार) कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यापाऱ्याचा आठवड्यापूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. कोरोनामुळे आजऱ्यातील हा ४४ वा मृत्यू आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क  झाले आहे.

कोरोना काळातील औषध, साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा : राजवर्धन निंबाळकर (व्हिडिओ)

कोरोना काळात जिल्ह्यातील शासकीय समितीने केलेल्या औषध, साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा झाला आहे. असा खळबळजनक आरोप पत्रकार परिषदेत जि. प. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी करून याची चौकशी ‘कॅग’मार्फत करावी अशी मागणी केली आहे.  

जयसिंगपूरमधील शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह : २० शिक्षक, १२० विद्यार्थी होणार क्वारंटाईन

इचलकरंजी (प्रतिनिधी) : जयसिंगपूरमधील एका महाविद्यालयीन शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील अकरावी, बारावीचे वर्ग आज (सोमवार) पासून बंद ठेवण्यात आले आहेत. तर शाळेतील अन्य शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. उद्या (मंगळवार) २० शिक्षक आणि १२० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन होण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली… Continue reading जयसिंगपूरमधील शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह : २० शिक्षक, १२० विद्यार्थी होणार क्वारंटाईन

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४० जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात आणखी ४० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज (सोमवार) दिवसभरात १३ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. ३८५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २७, भूदरगड तालुक्यातील १,चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४० जणांना लागण

error: Content is protected !!