कुर ग्रामस्थ पूर परिस्थितीमुळे ‘हवालदिल’

गारगोटी दि.२३(प्रतिनिधी)  : भुदरगड तालुक्यातील कुर कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील मुख्य वस्तीचे व बाजारपेठेचे गाव आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कुर गावातील वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून रस्त्यावर आले.  त्यामुळें गारगोटीकडे होणारी वाहतूक बंद आहे. तसेच पहिल्यांदाच राजिगरे गल्ली पर्यंत पुराचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. २०१९ मध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये पाणी पाटील… Continue reading कुर ग्रामस्थ पूर परिस्थितीमुळे ‘हवालदिल’

महापालिकेकडून पुरबाधीत क्षेत्रातील २९० कुटुंबांतील १०१९ नागरीकांचे स्थलांतर

कोल्हापूर (प्रतिनिधी):मुसळधार पावसाने पंचगंगा पातळीत सातत्याने वाढ होत असून राजाराम बंधारा येथे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरातील सखल भागात पुराचे पाणी येत आहे. महापालिकेच्यावतीने आज शहरातील 1019 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत रामानंदनगर येथील 13 कुंटुंबातील 40 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना रामानंदनगर तालीम, रेणुका मंदिर या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम परिसर, सिध्दर्थनगर या परिसरातील 74 कुटुंबांतील 312 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले. या… Continue reading महापालिकेकडून पुरबाधीत क्षेत्रातील २९० कुटुंबांतील १०१९ नागरीकांचे स्थलांतर

‘त्या’ दोन्ही गरोदर महिलांसाठी आपत्कालीन यंत्रणा ठरली ‘देवदूत..!

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे आज दुपारपासूनच एका गरोदर महिलेच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला गारगोटीत दवाखान्यात आणल्याशिवाय पर्याय नाही. पण गारगोटीपर्यँतच्या दहा किलोमीटर अंतरात वेदगंगा नदीचे पाणी दोन ठिकाणी रस्त्यावर आलेले असलेने तिला दवाखान्यात न्यायचे कसे? हा प्रश्न समोर ठेवून घरचे नातेवाईक हवालदिल झाले होते. अशा प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ झालेल्या आणि हवालदिल… Continue reading ‘त्या’ दोन्ही गरोदर महिलांसाठी आपत्कालीन यंत्रणा ठरली ‘देवदूत..!

कोल्हापुरात परिस्थिती चिंताजनक : सायंकाळपर्यंत ११६ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 212.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1425 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी, कांचनवाडी, चांदे व… Continue reading कोल्हापुरात परिस्थिती चिंताजनक : सायंकाळपर्यंत ११६ बंधारे पाण्याखाली

कोल्हापुरात २०१९ पेक्षाही भयंकर परिस्थिती : पालकमंत्री सतेज पाटील  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे २०१९ पेक्षाही भयानक परिस्थिती होईल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली असून एनडीआरएफ पथकांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. आणखी काही जवानांच्या टीम सुद्धा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पंचगंगेची पाणी पातळी ५२… Continue reading कोल्हापुरात २०१९ पेक्षाही भयंकर परिस्थिती : पालकमंत्री सतेज पाटील  

२०१९ ची पुनरावृत्ती : अखेर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

टोप (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज दुपारी कोल्हापूर महामार्ग बंद झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. शिरोली येथे सांगली फाटा ते पंचगंगा पूल या दरम्यान महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला आहे. आज सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत सांगली फाटा येथील दोन्ही सेवा रस्त्यावर पुराचे पाणी आले… Continue reading २०१९ ची पुनरावृत्ती : अखेर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

भुदरगड तालुक्यात पावसाचे थैमान : शेणगावात दहा पेक्षा जास्त घरे जमिनदोस्त

गारगोटी (प्रतिनिधी)  : भुदरगड तालुक्यात पावसाने अक्षरश:हा पावसाने थैमान घातले असून वेदगंगेच्या महापुराने नदिकाठावरील गावांत दहशत पसरली आहे. गारगोटी शहर व खानापूर गावाला बेटाचे स्वरुप आले आहे. तालुक्यातील कूर म्हसवे, दारवाड अशी अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. अनेक घरांची पडझड  झाली आहे. शेणगावात अनेक घरात पाणी शिरले आहे. १० घरे जमिनदोस्त झाली आहेत. तर… Continue reading भुदरगड तालुक्यात पावसाचे थैमान : शेणगावात दहा पेक्षा जास्त घरे जमिनदोस्त

पन्हाळ्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पन्हाळा (प्रतिनिधी) : चक्रीवादळाच्या जोरदार वाऱ्याने पन्हाळा शहर आणी परीसरात ठिकठीकाणी वृक्ष कोसळल्याने विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत झाला तर मुसळधार पावसाने परीसर भितीच्या छायेखाली राहीला होता. सकाळी जुनाट मोठे सुरुचे झाड वनविभागाच्या कार्यालया पाठीमागील भागात उन्मळुन पडले केवळ दैव बलवत्तर म्हणुन शेजारी राहणारे लोकमतचे पन्हाळा बातमिदार नितीन भगवान यांचे घर वाचले आन्यथा मोठा अनर्थ घडला… Continue reading पन्हाळ्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस : हवामान विभागाचा इशारा

पुणे  (प्रतिनिधी) : मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी  आज (रविवार) पासून पुढील ५ दिवस ढगाळ वातावरण  निर्माण होणार आहे.  तर काही ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असून… Continue reading राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस : हवामान विभागाचा इशारा

राज्याच्या ‘या’ भागात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज  

पुणे (प्रतिनिधी) : विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह  येत्या ४ दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता  पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटकापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा  विस्तार दक्षिण तामिळनाडूपर्यंत झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला  आहे. मराठवाड्यातील नांदेड,… Continue reading राज्याच्या ‘या’ भागात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज  

error: Content is protected !!