वारणानगर येथे ऊर्जांकुर प्रकल्पस्थळी नवचंडी यज्ञ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगर येथे ऊर्जांकुर सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये नवचंडी यज्ञ करण्यात आला. या नवचंडी यज्ञचे विधिवत पूजन आमदार डॉ. विनय कोरे, त्यांच्या पत्नी शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते झाले. उच्च, तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवचंडी यज्ञाचे दर्शन घेतले. वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या मालकीचा ऊर्जाकुर सहवीज निर्मिती प्रकल्प झाला असून, त्यानिमित्त… Continue reading वारणानगर येथे ऊर्जांकुर प्रकल्पस्थळी नवचंडी यज्ञ

गडदूवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ पैकीगडदूवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा विविध उपक्रमांनी उत्साहात झाला. प्रारंभी श्रीकृष्णाची प्रतिमा व गोकुळांची लेझीम वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्मकाळ सोहळा झाला. ‘स्वरसाज’ हा संगीत भजनाचा सुंदर कार्यक्रम पार पडला. यामध्ये विलास चौगले,धनाजी पाटील, (सोन्याची शिरोली), संतोष परीट, प्रवीण डाकरे, जयदीप डाकरे,… Continue reading गडदूवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

मुंबई (प्रतिनिधी) : आज राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून, या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्याबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानुसार नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचे शासन निर्णय तातडीने जारी केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा… Continue reading जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

गोविंदा आला रे..राज्यभर दहीहंडीचा उत्साह  

मुंबई : राज्यात आज तब्बल ३ वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. गुरुवारी रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. सकाळपासूनच मुंबई, ठाणे परिसरात दहीहंडी उत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. मुंबईत १२ गोविंदा जखमी मुंबईत दहीहंडी… Continue reading गोविंदा आला रे..राज्यभर दहीहंडीचा उत्साह  

दहीहंडीनिमित्त वृत्तपत्र, हौशी छायाचित्रकारांसाठी स्पर्धा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीनिमित्त कोल्हापुरातील हौशी छायाचित्रकार आणि वृत्तपत्रांसाठी काम करणार्‍या फोटोग्राफरसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. दहीहंडी सोहळ्यातील भव्यता, गोविंदा पथकांचे मानवी मनोरे, त्यातील थरार टिपणार्‍या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांसाठी ही स्पर्धा होणार आहे. शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ऐतिहासिक दसरा चौकात युवाशक्तीच्या दहीहंडीचा थरार रंगणार आहे.… Continue reading दहीहंडीनिमित्त वृत्तपत्र, हौशी छायाचित्रकारांसाठी स्पर्धा

देशभक्तीपर गीत, नृत्याचा बहारदार कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आझादी का अमृत महोत्सवांतर्गत महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे झाला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन देशभक्तीपर समूह गीते व नुत्य यांचे… Continue reading देशभक्तीपर गीत, नृत्याचा बहारदार कार्यक्रम

सायबर गुन्ह्याबाबत  जनजागृतीसाठी चित्ररथ, पथनाट्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आर्थिक फसवणूक व अन्य सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने चित्ररथ व पथनाट्याचे अनावरण आज (शुक्रवारी) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. चित्ररथ व पथनाट्याचे अनावरण व अपर अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय प्रिया पाटील, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे… Continue reading सायबर गुन्ह्याबाबत  जनजागृतीसाठी चित्ररथ, पथनाट्य

ठाकरेंच्या शिवसेनेशी निष्ठेने राहा, भगिनीने घेतले अभिवचन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या रक्षाबंधनानिमित्त भगिनींनी भावाला ओवाळून राखी बांधली. बहिणीला भेटवस्तू देऊन भावानेही खुश केले. अशा प्रकारे ठिकठिकाणी रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला; परंतु कोल्हापूरच्या टाकाळा येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे झाले. उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांना त्यांच्या भगिनी रूपाली यांनी टाकाळा येथील आपल्या माहेरी येऊन विशाल देवकुळे या… Continue reading ठाकरेंच्या शिवसेनेशी निष्ठेने राहा, भगिनीने घेतले अभिवचन

उद्यापासून पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा तसेच सायकल व तिरंग रॅली अमृत महोत्सावी दौड आणि हर घर तिरंगाचा प्रसार या उपक्रमांचा यात समावेश आहे. शुक्रवार, दि. १२ रोजी दौड काढण्यात येणार असून, यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ६०० ते… Continue reading उद्यापासून पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. घरात सनईचे सूर आळवले जात असून, मुलगी सारासह इतर महिला मेहंदी काढण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन तेंडुलकरला एकूण तीन भावंडे आहेत. सचिनचे वडील प्राध्यापक होते. नितीन तेंडुलकर हा या चार भावंडांमध्ये सर्वात मोठा भाऊ. त्यानंतर अजित तेंडुलकर.… Continue reading सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई

error: Content is protected !!