बोरपाडळे यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द

बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे (ता. पन्हाळा )येथील होणारी शिवपार्वती, चंद्राताई देवीची यात्रेनिमित्त होणारे कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती तंटामुक्त समिती अध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली. यात्रा घरगुती व साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन उपसरपंच शरद जाधव, सुदीप पाटील, सौरभ निकम, ग्रामसेवक विनोद पाटील यांनी केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड…

पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ (वय ७९) यांचे आज (गुरुवार) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी ते प्रसिद्ध होते. ‘झपाटलेला’ या महेश कोठारे दिग्दर्शित सिनेमात त्यांनी साकारलेली ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका खूपच गाजली होती. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी एका गुणी अभिनेत्याला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. १९४३ साली एका कन्नड कुटुंबात जन्मलेल्या… Continue reading ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ काळाच्या पडद्याआड…

‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी मलायका चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जीमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी मलायकाची चर्चा जरा वेगळ्याच कारणावरून होत आहे. मलायकाने गुलाबी टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची जिम वेयर… Continue reading ‘या’मुळे अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ट्रोल…

कलेसोबत रूग्णांची सेवा करणाऱ्या गोविंद चंदनशिवेचा गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड काळात सीपीआर रूग्णालयात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सीटी स्कॅन करून सेवा करणाऱ्या गोविंद चंदनशिवे यांचा उल्लेखनिय कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीत स्पॉटबॉय म्हणून काम करणारे बाळासाहेब माने, बबन मिरजे, मानसिंग साळोखे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. गोविंद चंदनशिवे जसा रुग्णांच्या सोबत आपुलकीने वागायचा तसाच तो आपल्या… Continue reading कलेसोबत रूग्णांची सेवा करणाऱ्या गोविंद चंदनशिवेचा गौरव

पालकमंत्र्यांच्या हस्ते आर्ट फाऊंडेशनच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन…

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापुरात आर्ट फाऊंडेशनच्यातर्फे बालिका दिनानिमित्त बाल चित्रकारांनी काढलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज (रविवार) पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही कला कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर, जगभर पोहचावी याचसाठी कोल्हापूर आर्ट फाऊंडेशनची स्थापना केली असल्याचे सांगण्यात आले. लॉकडाउनच्या काळामध्ये शाळा बंदच्या सुट्टीत कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलची विद्यार्थी कुमारी स्नेहा नागेश हंकारे (इयत्ता… Continue reading पालकमंत्र्यांच्या हस्ते आर्ट फाऊंडेशनच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन…

भजनसम्राट नरेंद्र चंचल काळाच्या पडद्याआड…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विशिष्ट गायनशैलीसाठी प्रसिद्ध असलेले भजनसम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (शुक्रवार) दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नरेंद्र चंचल यांच्या हिंदी फिल्म चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरुवात राजकपूर… Continue reading भजनसम्राट नरेंद्र चंचल काळाच्या पडद्याआड…

अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर यांना ‘धर्मादाय’चा मोठा दणका…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभिनेत्री अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर यांचा समावेश असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मागील कार्यकारिणीने पंधरा दिवसांत दहा लाख ७८ हजार पाचशे रुपये न्यासाच्या खात्यामध्ये जमा करावेत, असा आदेश आज (मंगळवार) पीठासीन अधिकारी धर्मादाय सहआयुक्त श. ल. हेर्लेकर यांनी दिला. पंधरा दिवसात रक्कम न भरल्यास वैयक्तिकरित्या प्रत्येकाला आर्थिक नुकसानीस जबाबदार… Continue reading अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर यांना ‘धर्मादाय’चा मोठा दणका…

प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चा मोफत प्रयोग…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कोल्हापूर यांच्या वतीने ख्यातनाम नाट्यवितरक आणि नाट्य व्यवस्थापक कै.प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त वऱ्हाड निघालयं लंडनला’ नाट्यप्रयोग रविवार (दि.२४) जानेवारी रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात दु. ४ वा.सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने… Continue reading प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चा मोफत प्रयोग…

आजरा येथे राम मंदिर निधी समर्पण अभियानास प्रारंभ  

आजरा (प्रतिनिधी) : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण हेतू निधी संकलन अभियान अखिल भारतीय स्तरावर राबवण्यात येत आहे. ३१ जानेवारीदरम्यान हे अभियान होणार आहे. आजरा येथे आज (गुरुवार) रोजी प.पू किसन महाराज यांचेहस्ते कार्यालयाचे उद्घाटन व अभियान प्रारंभ करण्यात आले. आजरा तालुक्यातील सर्व गावांत अभियान होणार असून या अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन… Continue reading आजरा येथे राम मंदिर निधी समर्पण अभियानास प्रारंभ  

श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी निधी देणार : ना. एकनाथ शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शनिवार) सकाळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. मंदिराच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी तातडीने निधीची तरतूद करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीने सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.  आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत ना शिंदे… Continue reading श्री अंबाबाई मंदिराच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी निधी देणार : ना. एकनाथ शिंदे

error: Content is protected !!