अलबादेवी येथे ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन

चंदगड (प्रतिनिधी) : गळ्याला फास लागून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने खरीप हंगामात शेतीच्या मशागतीचा प्रश्न भेडसावणाऱ्या अलबादेवी (ता. चंदगड) येथील शेतकरी सुरेश घोळसे यांना बैलांची नवीन जोडी देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. अलबादेवी येथे गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याने शेतकरी सुरेश घोळसे यांचे ८० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या… Continue reading अलबादेवी येथे ग्रामस्थांनी घडवले माणुसकीचे दर्शन

नितेश राणे यांच्याकडून वरवडेत भाताची लागवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजपाचे फायर ब्रँड नेते व आमदार नितेश राणे यांनी चिखलात उतरून भाताची लागवड केली. कोकणी माणूस आपले गावचे अस्तित्व विसरत नाही. नितेश राणे हे आमदार असले तरी कणकवली तालुक्यातील वरवडे गावात त्यांच्या कुटुंबीयांची शेती आहे. आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी जोत धरून नांगरणी केली आणि शेतीचा आनंदही घेत लावणी केली. शिवाय शेतकऱ्यांसोबत… Continue reading नितेश राणे यांच्याकडून वरवडेत भाताची लागवड

भुदरगडच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाटगाव धरण परिसरात गेले चार दिवस संततधार पाऊस सुरू असून, वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. गेली पंधरा दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली होती; परंतु सध्या समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पश्चिम… Continue reading भुदरगडच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर

दऱ्याचे वडगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा…

दिंडनेली (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्य कृषिदिन आणि कृषी संजीवनी सप्ताह सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी नाईक यांच्या फोटो पुजन आणि दिपप्रज्वलन विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोनामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना बी-बियाणे वाटप आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलरचे वाटप जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी… Continue reading दऱ्याचे वडगाव येथे कृषिदिन उत्साहात साजरा…

कृषी संजीवनी सप्ताहाला चांगला प्रतिसाद

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षानिमित्य २५ जूनपासून कृषी विभागामार्फत घेण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाला नेसरीसह परिसरातील सांबरे, अर्जुनवाडी, हडलगे, तावरेवाडी, सरोळी, हेळेवाडी आदी गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. गडहिंग्लजच्या उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री फलाटे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रातील विविध विषयावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत. या सप्ताहात कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या… Continue reading कृषी संजीवनी सप्ताहाला चांगला प्रतिसाद

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : महात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ५० हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे, पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट घातल्यामुळे ९० टक्के लाभार्थी शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांची ही घोर फसवणूक आहे. त्यामुळे नवीन नियम आणि निकष तत्काळ रद्द करावेत आणि… Continue reading प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

महागावात पिके लागली वाळू, दुबार पेरणीचे संकट

महागाव (प्रतिनिधी) :एप्रिल-मेमध्ये वळवाच्या पावसाने आधार दिला. जूनमध्ये मात्र मान्सूनने अजूनही दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. भात पिकाची उगवण झाली असली तरी पावसाअभावी हे पिके वाळू लागले आहे. पाऊस असाच लांबत चालला तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहाणार आहे. जनावरांची वैरण आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.… Continue reading महागावात पिके लागली वाळू, दुबार पेरणीचे संकट

७५ हजार हेक्टर जमिनीला पाणी देण्यात यश : मुश्रीफ

पिंपळगाव खुर्द (प्रतिनिधी) : कोरडवाहू व डोंगराळ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील ७५ हजार हेक्टर जमिनीला पाणी देण्यात मी आणि स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यशस्वी झालो, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या हरितक्रांतीमुळे शेतकऱ्यांचे बदललेले राहणीमान व उंचावलेला आर्थिक स्तर मनाला समाधान देणारा आहे, असेही ते म्हणाले. पिंपळगाव खुर्द, ता. कागल येथे काळम्मावाडी… Continue reading ७५ हजार हेक्टर जमिनीला पाणी देण्यात यश : मुश्रीफ

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : मंत्री भुसे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली… Continue reading कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : मंत्री भुसे

पर्यावरण संवर्धनासाठी सिडबॉल्सची निर्मिती

राशिवडे (प्रतिनिधी)  : पर्यावरण संवर्धन हा उदात्त हेतू ठेवून बीज संकलन करण्याबरोबरच सिडबॉल्स तयार करण्याचे काम गेले दोन महिने आपला दैनंदिन अभ्यास सांभाळत मुले करत आहेत. खानापूर, ता. भुदरगड येथील पर्यावरण मित्र अवधूत पाटील यांच्या कन्या जान्हवी व मिथाली यांनी विविध देशी करंज, जांभूळ, काजू, फणस, आंबा, हिरड, चिंच, काटेसावर, आपटा, कांचन, बहावा, पळस या… Continue reading पर्यावरण संवर्धनासाठी सिडबॉल्सची निर्मिती

error: Content is protected !!