ड्रोन कॅमेराद्वारे नवरात्रोत्सवाचे चित्रीकरण, थेट प्रक्षेपण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यावर्षी देवस्थान समितीतर्फे शारदीय नवरात्रोत्सवाचे चित्रीकरण, थेट प्रक्षेपण व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. आज या ड्रॉन कॅमेऱ्याचे उदघाटन देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, प्रशांत गवळी व देवस्थान कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सध्या एकूण ८० आयपी स्वरूपाचे कॅमेरे व… Continue reading ड्रोन कॅमेराद्वारे नवरात्रोत्सवाचे चित्रीकरण, थेट प्रक्षेपण

टोप येथील देखावा स्पर्धेत गणेश, हनुमान तालीम प्रथम  

टोप (प्रतिनिधी) : गणेशोत्सवनिमित्त येथील ग्रा.पं. च्या वतीने आयोजित आकर्षक देखावा स्पर्धेमध्ये गणेश तालीम व हनुमान तालीम मंडळ यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. या देखावा स्पर्धेमध्ये १० मंडळांनी भाग घेतला होता. यासाठी गावाबाहेरील परीक्षक ग्रा.पं. ने नेमले होते. आज ग्रा.पं. च्या देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. यामधील अन्य विजेते : व्दितीय- भगतसिंग ग्रुप,… Continue reading टोप येथील देखावा स्पर्धेत गणेश, हनुमान तालीम प्रथम  

तुरंबे येथील गणपतीला काँग्रेसतर्फे साकडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका काँग्रेसच्या वतीने आज तुरंबे येथील गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. ‘देशातील आणि राज्यातील महागाई कमी होऊ दे आणि बेरोजगारी कमी होऊ दे आणि देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येऊ दे’, यासाठी गणपतीला साकडे घालण्यात आले. यावेळी विजयसिंह मोरे, सुशील पाटील-कौलवकर, सुप्रिया साळुंखे, प्रभाकर पाटील, उत्तम पाटील, वैभव तहसीलदार, सागर धुंदरे,… Continue reading तुरंबे येथील गणपतीला काँग्रेसतर्फे साकडे

रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनतर्फे महागणपतीला साकडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनच्या वतीने देशावर, जगावर पुन्हा महामारी, दारिद्र्य महागाई, युद्ध अशी संकटे पुन्हा येऊ नयेत, तसेच सर्वत्र सुख-शांती, समाधान नांदावे, अशी प्रार्थना करण्यात आली. आज सकाळी गणेशोत्सवानिमित्त ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे क्लबच्या वतीने अभिषेक करण्यात आला. तसेच सोहन स्विटस पंजाब यांच्यावतीने देण्यात आलेल्या लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.… Continue reading रोट्रॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजनतर्फे महागणपतीला साकडे

मिणचे येथे जय हनुमान मित्र मंडळातर्फे माजी सैनिकांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिणचे येथील जय हनुमान मित्र मंडळ, दर्गा चौकच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त माजी सैनिक व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वडगावचे पोलिस निरीक्षक भैरव तळेकर, जि.प.चे माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव उपस्थित होते. पोलिस निरीक्षक तळेकर म्हणाले, देशासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांचा सत्कार करून जय हनुमान मंडळाने त्यांचा यथोचित सन्मान… Continue reading मिणचे येथे जय हनुमान मित्र मंडळातर्फे माजी सैनिकांचा सत्कार

कळेसह धामणी खोऱ्यात भक्तिमय वातावरणात विसर्जन

कळे (प्रतिनिधी) : कळे परिसरासह धामणी खोऱ्यात उत्साहात व भक्तीमय वातावरणात गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात व पारंपरिक वाद्यांच्या गजरात गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सावर्डे, मल्हारपेठ, मोरेवाडी, वाघुर्डे, सुळे, पणुत्रे, हरपवडे, वेतवडे, पणोरे आदी गावांमध्ये घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन झाले. प्रत्येक… Continue reading कळेसह धामणी खोऱ्यात भक्तिमय वातावरणात विसर्जन

जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना

कोल्हापूर (प्रतिनिध) : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी संचालक वेशभूषाकार व प्रॉडक्शन्स मॅनेजर श्याम काणे यांच्या हस्ते श्री’ चीं आरती करण्यात आली. यावेळी जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना करण्यात आली. संस्थेचे प्रमुख कार्यवाह रणजित जाधव,… Continue reading जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी गणरायाकडे प्रार्थना

अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आज (सोमवारी) लालबाग गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठीतून ट्विट करत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, गणेशोत्सवादरम्यान… Continue reading अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांच्या १६ टम, ९० टेम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व ५ जेसीबी, ७ पाण्याचे टँकर, २ रोलर, २ बूम अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. महापालिकेचे अग्निशमन दलाचे… Continue reading घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र व्हावे : अरविंद काळे

कोतोली (प्रतिनिधी) : मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणून काम करावे, असे आवाहन पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी केले. ते कोलोली येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात; पण कायद्याचे नियम पाळून साजरा करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल… Continue reading मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र व्हावे : अरविंद काळे

error: Content is protected !!