१५ वर्षे पूर्ण झालेली सरकारी वाहने स्क्रॅप करणार : गडकरी

नागपूर (वृत्तसंस्था) : देशात भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली सर्व वाहने यानंतर पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर धावणार नाही. ती सर्व वाहने स्क्रॅप केली जाणार असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाने घेतल्याचे सांगितले. ते नागपुरात अॅग्रोव्हिजन-२०२२ च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित होते.  पेट्रोल डिझेल हें विदर्भातून काय तर… Continue reading १५ वर्षे पूर्ण झालेली सरकारी वाहने स्क्रॅप करणार : गडकरी

दापोलीतील साई रिसॉर्ट तोडकामास स्थगिती

दापोली (प्रतिनिधी) : येथील साई रिसॉर्ट तोडकामास स्थगिती देण्यात आली आहे; पण साई रिसॉर्टच्या बाजूला असलेले सी कौंच रिसॉर्ट भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या उपस्थितीत पाडण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही रिसॉर्ट ४० ते ५० दिवसांत पाडले जाणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. साई रिसॉर्ट प्रकरण न्यायप्रविष्ट त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याची ऑर्डर अद्याप आलेली नाही. सरकारी जमिनीवर अनिल… Continue reading दापोलीतील साई रिसॉर्ट तोडकामास स्थगिती

राज्यात मध्यावधी निवडणुका ? : रावसाहेब दानवे

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून सातत्यानं विधानसभेची मध्यावधी निवडणूक होणार असल्याची विधान राजकीय नेत्याकडून केली जात आहे. उद्धव ठाकरे, जयंत पाटलांसह अनेक नेत्यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकित केलेले असतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील अशाच पद्धतीचे विधान केले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथे एका कार्यक्रमाला उपस्थित… Continue reading राज्यात मध्यावधी निवडणुका ? : रावसाहेब दानवे

अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर

खेड : शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना खेड येथील स्थानिक कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खासदार संजय राऊतांनंतर अनिल परबांना देखील जामीन मंजूर झाल्याने आता उद्धव ठाकरे गटालाही दिलासा मिळाला आहे. परब यांना यापूर्वी कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता. साई रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी अनिल परब… Continue reading अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर

शरद पवार भावूक होतात तेव्हा…..

औरंगाबाद (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना डी. लिट पदवी देऊन गौरव केला. कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डी. लिट देऊन गौरवण्यात आले. यावेळी शरद पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ आज पार पडला. ‘सुपर कॉम्प्युटर’ चे जनक विजय भटकर… Continue reading शरद पवार भावूक होतात तेव्हा…..

देशात भाजपने हिंसा, द्वेष, दहशत पसरवली : राहुल गांधी

शेगाव (वृत्तसंस्था) : देशात आज भाजपने हिंसा, द्वेष आणि दहशत पसरवली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विशेषतः या आधीच्या सभेत त्यांनी सावरकरांविरोधात वक्तव्य… Continue reading देशात भाजपने हिंसा, द्वेष, दहशत पसरवली : राहुल गांधी

चिखली येथे मनसे नेते, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शेगाव (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची शेगावमधील सभा उधळण्यासाठी शेगावकडे येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी चिखली नाक्यावर रोखले आहे. यानंतर त्या ठिकाणीच मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही सुरू झाली. दरम्यान पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, दिलीप बापू धोत्रे यांच्यासह काही… Continue reading चिखली येथे मनसे नेते, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

भारत जोडो यात्रेत वाजले नेपाळचे राष्ट्रगीत; काँग्रेसची फजिती

वाशिम (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत दररोज अनेक हास्यास्पद प्रकार पहायला मिळत आहेत. बुधवारी रात्री राहुल गांधींची वाशिम जिल्ह्याच्या मेडशी येथे सभा झाली. या सभेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला आणि राहुल गांधींसोबत सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांची चांगलीच फजिती झाली. सभेनंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेते राष्ट्रगीतासाठी… Continue reading भारत जोडो यात्रेत वाजले नेपाळचे राष्ट्रगीत; काँग्रेसची फजिती

चित्रा वाघ भडकतात तेव्हा….

यवतमाळ (वृत्तसंस्था) : तुमच्या आरोपांमुळे संजय राठोड यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त झाले आहे का, असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर मात्र चित्रा वाघ प्रचंड भडकल्याचे पाहायला मिळाले. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्याच अनुषंगाने आज त्या यवतमाळमध्ये आल्या होत्या. दरम्यान, पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून मंत्री संजय राठोड… Continue reading चित्रा वाघ भडकतात तेव्हा….

प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबर हटवा : हिंदू संघटना 

सातारा (प्रतिनिधी) : सातारा येथील अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे हिंदू संघटनांनी अफझल खानाची कबरच हटवण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनांची ही मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावली आहे. अफझल खानाच्या कबरीला धक्का पोहोचू देणार नाही, असे शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.… Continue reading प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबर हटवा : हिंदू संघटना 

error: Content is protected !!