विधानसभेत अजित पवार आक्रमक, शंभूराज देसाईंना फटकारले

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांनाही त्यांनी चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले. आपण कॅबिनेटमध्ये एकत्र… Continue reading विधानसभेत अजित पवार आक्रमक, शंभूराज देसाईंना फटकारले

बॉक्स ऑफिसवर आमीर-अक्षय कुमार फेल

मुंबई :  आमीर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु, दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करु शकली नाही; परंतु या दोन्ही दिग्गजांना पछाडून साऊथ सिनेमाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला सीता-रामम हा दक्षिणेकडील चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. एवढेच नव्हेतर तरुण वर्ग या… Continue reading बॉक्स ऑफिसवर आमीर-अक्षय कुमार फेल

सेन्सेक्सने ओलांडला ६० हजार अंकांचा टप्पा

मुंबई : शेअर बाजारात आजही खरेदीचा उत्साह दिसत असून, सेन्सेक्स निर्देशांक वधारला आहे. शेअर बाजारात आजही चांगली तेजी असल्याचे दिसून येत आहे. सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंकांचा टप्पा गाठला आहे. जवळपास चार महिन्यानंतर सेन्सेक्स  ६० हजार अंकांचा टप्पा ओलांडणार आहे. आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांक ९५.८४ अंकांनी वधारत ५९,९३८.०५  अंकांवर खुला… Continue reading सेन्सेक्सने ओलांडला ६० हजार अंकांचा टप्पा

लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होणार : कंबोज

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांच्या या दाव्यानंतर आता कोणत्या नेत्याच्या पाठी तपास संस्थांचे शुक्लकाष्ठ लागणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ते म्हणाले की, लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची नवाब मलिक… Continue reading लवकरच राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला अटक होणार : कंबोज

हे बेईमानांचे सरकार ; आदित्य ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा… Continue reading हे बेईमानांचे सरकार ; आदित्य ठाकरे

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद देण्यात आल्याने ही जबाबदारी बावनकुळे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, तर आमदार आशीष शेलार यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.… Continue reading भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : मला पोलिसांनी क्लिन चीट दिल्यानंतर मी मंत्री झालो आहे. या पुढे जर कोणी माझ्यावर आरोप केले तर त्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा संजय राठोड यांनी टीका करणाऱ्यांना दिला आहे. मी चार वेळा मोठ्या मतांनी निवडून आलो आहे. आता मला मंत्री पदाची संधी मिळाली आहे, गेल्या वेळीही मिळाली होती. एक दुर्दैवी… Continue reading आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा

सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. घरात सनईचे सूर आळवले जात असून, मुलगी सारासह इतर महिला मेहंदी काढण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. सचिन तेंडुलकरला एकूण तीन भावंडे आहेत. सचिनचे वडील प्राध्यापक होते. नितीन तेंडुलकर हा या चार भावंडांमध्ये सर्वात मोठा भाऊ. त्यानंतर अजित तेंडुलकर.… Continue reading सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई

कोतवालांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करा

मुंबई (प्रतिनिधी) : कोतवालच्या रास्त व न्याय मागण्या त्वरित मान्य कराव्यात, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष विजयकुमार चौरपगार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव महसूल व वनविभाग, विभागीय आयुक्त अमरावती, पवनीत कौर (जिल्हाधिकारी अमरावती) यांच्यामार्फत देण्यात आले. निवेदन देताना महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष बी. ए. राजगडकर, महासचिव पी.… Continue reading कोतवालांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करा

आमदार मुश्रीफ यांनी सोडला मुंबईतील सरकारी बंगला

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची सोय याच बंगल्यात केली जात असे. जिल्ह्यातील रुग्णांसाठी मंत्री मुश्रीफ यांचा हा बंगला म्हणजे ‘हक्काचे घर’ होते. या बंगल्यात मुक्कामी असणारे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जड… Continue reading आमदार मुश्रीफ यांनी सोडला मुंबईतील सरकारी बंगला

error: Content is protected !!