पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात नेणार : फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी कालव्याच्या माध्यमातून मराठवाड्यात नेले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  २०१९ मध्ये सांगली-कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आपण जागतिक बँकेकडून एका प्रोजेक्टला मान्यता दिली होती. त्यात वळण-बंधारे आणि कॅनल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला होता. गुरुवारच्या बैठकीत… Continue reading पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात नेणार : फडणवीस

उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरेंनी बोलावले तर आम्ही नक्की जाऊ असे मह्त्त्वपूर्ण विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (गुरुवारी) मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पूजेसाठी दीपक केसरकर हे उपस्थित होते. आजूबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावे, असा सल्लाही केसरकरांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी… Continue reading उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास आम्ही नक्की जाऊ : केसरकर

भाजपला २७, शिंदे गटाला १४ मंत्रिपदे मिळणार ?

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून, यावर अधिकृत शिक्कामोर्तब ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला २७, तर शिंदे गटाच्या वाट्याला १४ मंत्रिपद येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे नगरविकास, राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हे खाते, तर भाजपकडे… Continue reading भाजपला २७, शिंदे गटाला १४ मंत्रिपदे मिळणार ?

कोकणच्या २३ गावांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणामधील २३ गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली आहे. राजापूर येथील अर्जुना नदीला पूर आला असून, आसपासच्या गावांतील लोकांना सतर्क राहण्याच्या व सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकण आणि गोव्यात देखील पुढील… Continue reading कोकणच्या २३ गावांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर,… Continue reading पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ३ घोषणा आणि तुफान फटकेबाजी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील कर लवकरच कमी करण्यात येईल तसेच शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याबरोबरच हिरकणी गाव वाचवण्याची नव्या सरकारतर्फे २१ कोटीचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. जलयुक्त शिवार, सारथी… Continue reading मुख्यमंत्री शिंदे यांच्या ३ घोषणा आणि तुफान फटकेबाजी

आम्ही बंड नाही तर उठाव केला : गुलाबराव पाटील

मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा नाही. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते; पण चहापेक्षा किटली गरम. आमचे फोनही घेतले जात नव्हते, अशी खंत गुलाबराव पाटील… Continue reading आम्ही बंड नाही तर उठाव केला : गुलाबराव पाटील

उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने कोर्टात सादर केला. हा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला असल्याने पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रकांत पटेल यांच्याशी संबंधित पुष्पक… Continue reading उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यांना दिलासा

आरेमध्ये कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा : अमित ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा शिंदे सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकले होते. आपल्याला विकास हवाच आहे; पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. त्यामुळे मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रहाची विनंती राज ठाकरे यांचे… Continue reading आरेमध्ये कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा : अमित ठाकरे

तुरुंगात मारहाण, विनयभंग झाल्याचा केतकी चितळेचा दावा

मुंबई (प्रातिनिधी) : तुरुंगात आपला विनयभंग आणि मारहाण झाल्याचा दावा मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी १५ मे रोजी अटक केली होती, तर २२ जून रोजी तिची जामिनावर सुटका करण्यात आली. तिने आपली अटक बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे. अभिनेत्री चितळे… Continue reading तुरुंगात मारहाण, विनयभंग झाल्याचा केतकी चितळेचा दावा

error: Content is protected !!