पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला विस्थापितांचा आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा व शहरामध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांचा, कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटच्या सदस्यांसमवेत जिल्हा परिषदेमध्ये आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उप‍जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे… Continue reading पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला विस्थापितांचा आढावा

उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी : शहराला टँकरव्दारे होणार पाणीपुरवठा

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी जल उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे ही पाणी उपसा प्रक्रिया केंद्रे बंद झालेली आहेत. त्यामुळे शहरातील जवळ जवळ ८० टक्के भागातील पाणी पुरवठा शुक्रवार दि. २३ जुलै २०२१ पासून बंद झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणेच्या दृष्टीने… Continue reading उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी : शहराला टँकरव्दारे होणार पाणीपुरवठा

ग्रामपंचायतींची वीज न तोडण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश : ना. हसन मुश्रीफ  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीज बिलांच्या थकीत वसुलीसाठी महावितरणने ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या वीजजोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे कारवाईही झाली होती. काल (मंगळवार)  रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयांमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये महावितरणने ग्रामपंचायतींच्या वीज तोडू नयेत आणि तोडलेल्या वीजजोडण्या तात्काळ पूर्ववत जोडण्याचे बैठकीमध्ये एकमताने ठरले आहे. तसे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी… Continue reading ग्रामपंचायतींची वीज न तोडण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश : ना. हसन मुश्रीफ  

कोल्हापूर परिक्षेत्रात शिरोली पोलीस ठाणे ठरले उत्कृष्ट…

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर  परिक्षेत्रातील उत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेमध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे. या निवडीने कोल्हापूर पोलीस दलाची मान उंचावली आहे. यामुळे  कोल्हापूर जिल्ह्याला उत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेमध्ये निवड होण्याचा बहुमान मिळालेला आहे. पोलीस दलाच्या कामकाजात निकोप स्पर्धा वाढावी. तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध यामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने देशपातळीवर… Continue reading कोल्हापूर परिक्षेत्रात शिरोली पोलीस ठाणे ठरले उत्कृष्ट…

गुड न्यूज : सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आल्याने नियमानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने चालू होणार असल्याचे आश्वासन मिळाल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी स्पष्ट केले होते. मात्र, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत आदेश निघाला नसल्याने याबाबत काहीशी साशंकता होती. मात्र आज (शनिवार) सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी करून जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवार १९ पासून सुरु करण्यास… Continue reading गुड न्यूज : सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने उघडणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूरच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज (गुरुवार) सकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. रेखावार यांनी ऑगस्ट २०१२ ते ऑगस्ट २०१३ या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले होते. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट २०१३ ते फेब्रुवारी २०१४ मध्ये सहायक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी… Continue reading कोल्हापूरच्या नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार…

मौनी विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या शासकीय प्रतिनिधीपदी बाजीराव चव्हाण

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळावर शासकीय प्रतिनिधी म्हणून बाजीराव कुंडलिक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदकुमार ढेंगे यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. या पदी चव्हाण यांची निवड झाल्याचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे, अवर सचिव वि. व. दळवी यांनी पाठवले आहे. बाजीराव चव्हाण हे भुदरगड तालुक्यामध्ये राजकीय… Continue reading मौनी विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या शासकीय प्रतिनिधीपदी बाजीराव चव्हाण

आता राहुल रेखावर कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी : दौलत देसाई यांची बदली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची बदली झाल्याचे वृत्त आहे. त्यांची वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. आता राहुल रेखावर हे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असतील. देसाई यांनी कोरोनाच्या महामारीत जिल्ह्यात चांगले काम केले होते.

उद्यापासून गारगोटीमध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून गारगोटीसह अनेक ठिकाणी लॉकडाऊन आहे. पण गारगोटी येथील दुकानांची शटर्स ओपन होतील या आशेवर असणाऱ्या व्यापारी आणि नागरिकाना पुन्हा आता पाच दिवस कडक लॉकडाउनला सामोरे जावे लागणार आहे. बुधवार (दि.१४) ते रविवार (दि.१८) जुलैपर्यंत गारगोटी परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये आता तिव्र… Continue reading उद्यापासून गारगोटीमध्ये पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन…

हातकणंगले तालुक्यातील हॉटस्पॉट गावांना तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांची भेट

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील वाढता कोरोना आकडा पहाता याठिकाणची २२ गावे हॉटस्पॉट घोषीत केली आहेत. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या गावावर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले असून आज (सोमवार) तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रदिप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काही गावांना भेट दिली. तर गावातील दक्षता समिती, आरोग्य विभागांना सुचना… Continue reading हातकणंगले तालुक्यातील हॉटस्पॉट गावांना तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांची भेट

error: Content is protected !!