सावरवाडी (प्रतिनिधी)  :  कोगे ते कोल्हापूर  दरम्यान मुख्य रस्त्यावर एक धोकादायक वळण आहे. या वळणावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीची कार  उलटली . मात्र या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.

कोगे ते कोल्हापूर  मुख्य वाहतुकीच्या रस्त्याच्या वळणावर मध्यरात्री प्रवास करीत असतांना रस्त्याच्या वळणावर कारगाडीच्या  ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने  शेवरेलो कंपनीची कार पलटी होऊन भुईमुगाच्या शेतात गेली. यानंतर या गाडीच्या नंबर प्लेट काढून नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही कार कोणाची आहे हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अपघातस्थळी  करवीर पं.स. चे  माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी तात्काळ भेट देऊन या वळणाच्या ठिकाणी गतीरोधकची,  दिशादर्शक बोर्डची मागणी केली.