मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात किंवा देशात लवकरच मोठा बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमकीवजा ईमेलने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाकडून याबाबतची माहिती मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली आहे. या ईमेलमध्ये आज उद्या किंवा दोन दिवसात अचानक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. तो केव्हा आणि कुठे होणार हे शोधण्यासाठी वेळ नाही म्हणून राज्यात किंवा देशात कुठेही शक्य असल्यास दुर्लक्ष करू नका, असे ईमेलमध्ये म्हटले आहे.
या ईमेलने पोलिस यंत्रणा कामाला लागली असून ईमेल करणाऱ्या व्यक्तीचा माग पोलिस काढत आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा ईमेल आला आहे. तीन दिवसात अचानक मोठा ब्लास्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात किंवा देशात अन्यत्र कुठेही ब्लास्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.