कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे महामाहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी हे कोल्हापूर जिल्हाच्या एकदिवशीय दौऱ्यावर आलेत. काही वेळापूर्वीच विमानतळावर त्यांचे आगमन झाले. उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

आजच्या या दौऱ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल व कर्नाटकचे राज्यपाल व दोन्ही राज्यातील सीमाभागातील जिल्हाधिकारी यांच्यासमवेत महत्वपूर्ण संयुक्त बैठक होणार आहे.  

आज सकाळी राज्यपालांच्या स्वागतासाठी विमातळावर आयुक्त तथा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंग चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.