कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले येथील ‘आय ॲम कलाम फाऊंडेशन’ व अण्णासाहेब डांगे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. अकरा वर्षांखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू म्हणून सेंट झेवियर्सच्या अंशुल चुयेकर याची निवड झाली आहे.

याबद्दल फादर रत्नाकर दुशिंग, अँड्रू फर्नांडिस, विक्रम यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला. प्रीतम घोडके, आंतरराष्ट्रीय पंच भारतेश्वर चौगुले, क्रीडा शिक्षक अल्ताफ कुरेशी, आलम फर्नांडिस, मनीषा शिर्के यांचे त्याला मार्गदर्शन लागले. या स्पर्धेसाठी स्थानिक कोल्हापूरसह, सांगली, सातारा, पुणे, कोकण व कर्नाटकमधील एकूण १६० नामवंत बुद्धिबळपटू सहभागी होते.