कोल्हापूर (प्रतिनिधी) : दुबईत सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग घेणाऱ्या सांगली येथील उमेश नंदकुमार शिंदे याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. त्याचा फरारी झालेला साथीदार सनी उर्फ मिलिंद धनेश शेटे (वय २६, रा. वखारभाग, सांगली) याला आज (शुक्रवार) सांगलीत अटक करण्यात आली.

सांगली येथील उमेश शिंदे हा दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचचे बेटिंग घेण्यासाठी कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील तनवाणी हॉटेलमध्ये राहिला होता. बेटिंग घेत असताना त्याला १८ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र त्याचा सांगली येथील साथीदार सनी उर्फ मिलिंद शेटे फरारी झाला होता. त्याला आज सांगली येथून अटक करण्यात आली