मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या ईडी कारवाईविरोधातील  याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. तर  दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांनी आदेश दिले आहेत.  त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख अद्यापही ईडीच्या चौकशीला हजर झालेले नाहीत. या सर्व प्रकरणाविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले  होते. मात्र, मुंबई हायकोर्टाने सुनावणीस नकार दिल्याने त्यांचे प्रकरण दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे. मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने हजर राहण्यासाठी दिलेला समन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती.

आतापर्यंत हजर राहण्यास ईडीने  बजावलेल्या ५ समन्सांना अनिल देशमुख गैरहजर राहीले  आहेत. कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्न विचारण्याची विनंती अनेक वेळा केली होती. देशमुख यांनी अर्जाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईडीकडे कागदपत्रे किंवा विवरणपत्र सादर करण्याची परवानागी मागितली होती.