मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ‘रामायण’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. त्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चित्रपटात आपल्याला भलमोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

आता आणखी एका मोठ्या कलाकाराचं नाव समोर आलं आहे. झूम एंटरटेन्मेंटच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हे या चित्रपटात राजा दशरथांची भूमिका साकारणार आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, रामायणात ‘शूर्पणखा’ ची भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंह दिसणार आहे.

तर अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी ही माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

.