मुंबई  (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होम क्वॉरन्टाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्याने त्यांनी क्वॉरन्टाईन होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहणार नाहीत.

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या प्रकृतीविषयी चर्चा रंगल्या होत्या. त्यांना थोडा ताप असल्याने कोरोना चाचणी केली होती. ती निगेटिव्ह आली आहे. पण थकवा जाणवत असल्याने घरीच आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.