कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवीन वाशी नाका जवळील सुप्रभात कॉलनी मध्ये राहणाऱ्या १० वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. सफान शकील मेस्त्री असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या आजोबा दादामिया अहमदआनिफ मेस्त्री (वय ६८, रा. सुप्रभात कॉलनी. नवीन वाशी नाका) यांनी करवीर पोलीस ठाण्यांमध्ये सफान मेस्त्री याचे अपहरण झाल्याबाबतची फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दादामिया मेस्त्री त्यांचा नातू सफान मेस्त्री हा काल (शनिवारी) मावशीकडे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला तो घरी परत आला नाही. त्यामुळे मेस्त्री व त्यांच्या नातेवाईकांनी सफान मेस्त्री याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. त्यामुळे दादामिया मेस्त्री यांनी सफान मेस्त्री याचे अपरण झाल्या बाबतची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली आहे.