दिंडेनेर्ली ( प्रतिनिधी कुमार मेटील ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत इस्पुर्ली ता. करवीर येथील आरोही गणेश मोहिते या विद्यार्थिनींनीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

आरोही ही विद्या मंदिर इस्पुर्ली या शाळेची विद्यार्थीनी असून तिने 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला तर दिव्वेश दिगंबर कुऱ्हाडे विद्या मंदिर इस्पुर्ली रा. इस्पुर्ली ता. करवीर जि. कोल्हापूर याने 100 पैकी 96 गुण मिळवून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका राजलक्ष्मी बोरगावे , वर्गशिक्षिका आशा कांबळे मॅडम, आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. आरोहीने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याने तिच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षिकांवर ही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.