कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 1 मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अवर सचिव निलेश पोतदार यांनी कळविले आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. धैर्यशील माने, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, आ. प्रकाश आवाडे, आ. सतेज पाटील, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खा. राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर, माजी आ. संजयबाबा घाटगे, माजी आ. उल्हास पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह संबंधित शिष्टमंडळ, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, राजकीय प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही पोतदार यांनी सांगितले.