पुणे : पुण्यात कॉंग्रस शहराध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. पुण्यात या विरोधात भाजपने आंदोलन केलं आहे. पुण्यातील भाजपच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या जीविताविषयी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील काँग्रेस भवनमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेत.