मुंबई ( वृत्तसंस्था ) एका 21 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावरील ऑनलाइन मैत्रीच्या नावाखाली पार्टीसाठी बाहेर जाणं चांगलच महागात पडल आहे. पार्टीच्या नावाखाली संशयित आरोपीने या तरुणीला घराबाहेर घेऊन जात तिला अमली पदार्थ देत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार पीडित 21 वर्षीय तरुणीने तिच्याबरोबर घडलेला सर्वात धक्कादायक अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केला आहे. यात ती म्हणते की, हितिक शाहा नावाच्या तरुणाशी तीची सोशल मीडियावर मैत्री झाली होती. नव्या मित्रासोबत मज्जा मस्ती केल्यास अनेक दु:ख आणि चिंता दूर होतील असा विचार करुन ही तरुणी त्याला पार्टीच्या निमित्ताने भेटायला गेली.


पार्टीला गेल्यानंतर मद्यपानामुळे तीची शुद्ध हरपली अन् याच धूंदीत ती बराचवेळ राहीली. यानंतर काही वेळाने ती शुद्धीवर आल्यानंतर बलात्कार होत असल्याची जाणीव तीला झाली. अन् तीने मित्र अन् संशयित आरोपीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यानंर तक्रारकर्त्या युवतीने तिथून निघून गेल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचं ही तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.