हातकणंगले ( प्रतिनिधी ) : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिके नष्ट झाली, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरीदेखील शासनाकडून अद्याप ठोस आणि परिणामकारक मदतीची घोषणा झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते आणि आमदार सुनील प्रभु तसेंच संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्यामार्फत शासनाला निवेदन सादर केले.
संजय चौगुले यांनी “शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण सततच्या नैसर्गिक आपत्ती, कर्जाचे ओझे आणि अपुऱ्या मदतीमुळे तो निराश झाला आहे. शासनाने तातडीने सरसकट कर्जमुक्ती आणि थेट आर्थिक मदतीचा निर्णय घ्यावा, हीच खरी शेतकऱ्यांप्रती न्यायाची दिशा ठरेल” असे सांगितले
यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सुवर्णाताई धनवडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उषाताई चौगुले, युवासेना उपजिल्हा अधिकारी सचिन पाटील, हातकणंगले शहरप्रमुख धोंडीराम कोरवी, संदीप दबडे, उदयसिंह शिंदे, अभिनंदन सोळंकुरे, शरद पोवार, अर्जुन जाधव, अरुण घाटगे, सचिन चौगुले, संजय चौगुले, प्रकाश तांदळे, हरी पुजारी, प्रशांत नरंदेकर, ऋषिकेश दबडे, राजू कुंभार, संतोष भोसले, बाळासो जाधव, अक्षय लोंढे, मुकुंद नाळे, योगेश दबडे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.