कोल्हापूर ( प्रतिनिधी ): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूर (गोकुळ) दूध संघामार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून जमलेल्या निधीचा वापर गरजू लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्य खरेदीसाठी करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या योगदानातून साखर, तेल, रवा, पिठ्ठी, डाळी, कडधान्य, साबण, ब्लॉकेट, रजई या जीवनावश्यक वस्तू तसेच वही, पेन, स्कूल बॅग यासारखे शालेय साहित्य एकत्र करून १,००० पॅकेटस् तयार केले गेले आहेत. ही मदत सामग्री आज महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे आणि संचालक मंडळ आणि आयटकचे आणि संघटनेचे पदाधिकारी, गोकुळचे कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पूरग्रस्त भागाकडे वितरीत करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांकडून जमा झालेली रक्कमेतून गरजू लोकांसाठी शालेय उपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तूचे पॅकेस् व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. “गोकुळ दूध संघाचे कर्मचारी आणि संघटनेचा हा मदतीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा समाजोपकारी वृत्तीमुळेच आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत मदत मिळू शकते.” गोकुळ परिवाराने संकटाच्या काळात दिलेला हा मदतीचा हात समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा उत्कृष्ट प्रत्यय देतो.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के.डी.सी.सी बँकेचे संचालक राजेश पाटील, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, आयटकचे राज्याचे सदस्य कॉ.दिलीप पोवार, आयटकचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. एस.बी.पाटील, आयटकचे जिल्हा कमिटी सेक्रेटरी रघुनाथ कांबळे, अध्यक्ष मल्हार पाटील,व्ही.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, कॉ.संभाजी शेलार, संदेश पाटील, लक्ष्मण आढाव, योगेश चौगुले, कृष्णा चौगुले संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.