कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा ‘आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार सन २०२५ मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील पत्रकारांचा सत्कार गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्ते आणि सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.
यावेळी नविद मुश्रीफ म्हणाले की, पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांचे समाजप्रबोधनातील योगदान अमूल्य आहे. ग्रामीण भागातील वास्तव, शेतकरी प्रश्न, सहकार चळवळ आणि लोकहिताचे मुद्दे सातत्याने मांडणाऱ्या पत्रकार बंधूं, भगिनींचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. गोकुळच्या वाटचालीतही विविध प्रसिद्धी माध्यमांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. म्हणूनच ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ प्राप्त पत्रकारांचा गोकुळतर्फे गौरव करणे, हे आमचे कर्तव्य आणि कृतज्ञतेचे प्रतिक असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.
यावेळी पुरस्कारप्राप्त पत्रकारांना पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकारांनी गोकुळच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या गोकुळसारख्या सहकारी संस्थांना नेहमीच सहकार्य राहील, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी संघाचे संचालक अजित नरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच उपस्थित पत्रकार सुनिल पाटील पाडळी खुर्द, कुंडलिक पाटील दोनवडे, रामचंद्र देसाई कोनवडे, प्रदिप पाटील कडगांव, संभाजी पाटील धुंदवडे, आनंदा केसरे वारणा कापशी, भास्कर चंदनशिवे कागल, राजेंद्र दळवी पन्हाळा, सुरेश साबळे कसबा तारळे, रविराज ऐवळे कोथळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.