टोप ( प्रतिनिधी) अतिग्रे येथील हॉटेल सगरिका या लॉजिंग वर सुमन शिवाजी सरगर या महिलेची हातोडीचे घाव घालुन निर्घृण हत्त्या करण्यात आली. अतिग्रे ता. हातकणंगले येथील सगरिका हॉटेल हे कोल्हापूर सांगली मार्गा वरील नेहमीच चर्चेत असणारे हॉटेल आहे. या ठिकाणी बिअर बार व लॉजिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असतो.

दरम्यान घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दि. 12 रोजी सायंकाळच्या दरम्यान आदमगौस पठाण रा. घुनकी ता. हातकणंगले हा विवाहित महिला सुमन सरगर या महिले सोबत लॉजिंग मध्ये आला होता. आरोपी पाठाण याच्यात व मयत महिला यांच्या मध्ये प्रेम प्रकरणातून वारंवार पैशाची देवाण घेवाण होत होती. पठाण याने महिलेला दिलेल्या पैशाची तो वारंवार मागणी करुन ही सदर महिला आपली रक्कम परत देत नाही हे लक्षात येताच पठाण याने लॉज वर भेटण्यासाठी बोलावून घेत डोक्यात हातोडीचे तीन घाव घालुन निर्घृण हत्त्या केली. हत्त्या करताच पठाण यानेही चिट्ठी लिहित विषारी औषध प्राशन करत आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेल मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्याने आत्महत्ते ची घटना थांबावली.

दरम्यान एका कार्यक्रमा दरम्यान सुमन सरगर व पठाण याची ओळख झाली त्याचे रूपांतर प्रेमात झाले. गेली कित्तेक वर्षे ते दोघेही प्रेमा मध्ये अडकून होते या दरम्यान सरगर व पठाण यांच्या मध्ये अनेकदा शारीरिक समंद येत राहिले याचाच फायदा घेऊन सरगर या महिलेने सात लाख रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार पठाण याने हात्त्या केल्या नंतर पोलीस ठाण्या मध्ये केली आहे. ही रक्कम देणे सुमन सरगरला शक्य नसल्याचे पठाण याला समजल्या नंतर त्याने सुमन हिचा काटा काढण्याच्या हेतूने अतिग्रे येथील सागरिका लॉज वर घेऊन येत सरगर हिच्या डोक्या मध्ये हातोडीचे घाव घालून हत्त्या केली या मध्ये जागीच तिचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच रुकडी , अतिग्रे , चॊकाक , माले , मुडशिंगी या गावातील नागरिकांनी हॉटेल सगरिका समोर मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उप अधीक्षक रोहिणी साळुंके व हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे आपल्या सहकार्यांसह तातडीने धाव घेतली.

दरम्यान जमावाला काबू करत घडलेल्या सर्व घटनाचा आढावा घेत माहिती घेतली रात्री उशिरा पर्यंत या बाबत तपास करण्यात पोलीस प्रशासन कार्यरत होते. आरोपी पठाण यांने या पूर्वी आपल्या पहिल्या पत्नीचीही हात्त्या केली होती. या हत्तेचा पठाण याच्या वर गुन्हा नोंद असुन या घटनेची सुनावणी न्यायालयात आजही सुरुच आहे.