मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानची हेरगीरी करणारी ज्योती मल्होत्राला पोलीसांनी अटक केलीय. तर चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय. पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पोहोचवलीय.दरम्यान या प्रकरणात ज्योती अटकेत असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आलीय. तर ज्योतीनं पाकिस्तानच्या आयएसआयकडून पैसे घेतल्याची माहिती समोर आलीय. मागील 2 वर्षात ज्योतीनं तीनवेळा पाकिस्तानचा दौराही केला. दरम्यान या दौऱ्यात तीनं ISIच्या अधिका-यांची भेट घेतली होती. तसंच या अधिकाऱ्यांनी तिची चांगलीच खातिरदारी केली होती.
ज्योती पाक दूतावासात ज्योती पाहूणाी म्हणून गेली होती. ज्योतीची पाकिस्तानात फिरण्याची व्यवस्था ISI नेच केली होती. हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीला पैसे मिळत असल्याची माहिती समोर आलीय. पाकिस्तानी नेत्यांसोबत ज्योतीचे अनेक व्हिडिओ समोर आलेयत. ISI एजंट अली आणि शाहिदलाही ज्योती भेटली होती. शाहिदचा नंबर जट्ट रंधावा नावानं ज्योतीनं सेव्ह केला होता. भारतविरोधी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा तिच्यावर आरोप असून ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्त दानिशच्या देखील संपर्कात होती.
तर दानिशने ज्योतीला पाकिस्तानचा व्हिसाही दिला होता. ज्योती आणि दानिश भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. त्यामुळे भारतानं दानिशला पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणून घोषित केलं होतं. म्हणजेत 24 तासात त्याला भारत सोडण्याचे आदेश 13 मे रोजी देण्यात आले होते. मात्र, त्याच्या संपर्कात असलेल्या ज्योतीला आता अटक करण्यात आली आहे.