मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे . या आधी 2021 साली पॉर्नोग्राफी प्रकरणात चर्चेत आला होता. त्याला अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा आता ईडीच्या कचाट्यात सापडला आहे. राज कुंद्राच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. ईडीकडून राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इडीने आज व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी, राज कुंद्रा याची 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत राज कुंद्रायांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

ED ने का केली कारवाई..?

मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई प्रिवेंशन ऑफ मनी लाँन्ड्रिंग एक्ट PMLA2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं बिटकॉइन पॉन्जी स्कॅम प्रकरणात राज कुंद्रावर ही कारवाई केली आहे. राज कुंद्राच्या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये त्याचा पुण्यातील बंगला आणि काही इक्विटी शेअर्स आहेत.ईडीकडून राज कुंद्राविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास सुरू आहे. एका क्रिप्टोकरन्सी प्रकरणात ईडीकडून राज कुंद्राची चौकशी सुरू आहे. भारतात क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे. पण राज कुंद्राने बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करून व्यवहारात फेरफार केल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.