कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापुरात यादव नगर, डवरी वसाहत येथील एका युवकाचा पुर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातुन खून केल्याची घटना समोर आली आहे. अजय शिंदे वय 25 रा. यादव नगर, डवरी वसाहत)असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर खून करून हल्लेखोर पसार झाले आहेत.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी यादवनगर येथे दोन गटात पुर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातुन मोठा वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगविले होते. यानंतर संध्याकाळी परत पुन्हा एका गटाने अजय शिंदे याला रंकाळा परिसरात बोलवून घेतले. यावेळी पुन्हा वाद झाला. यानंतर दुसऱ्या गटाने अजय शिंदे याच्यावर धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

तर हल्ल्यानंतर अजय याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. यावेळी सीपीआर परिसरात अजय शिंदे याचे कुटुंबीय आणि युवकांनी मोठी गर्दी केली असून सीपीआर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालय परिसरात पोलीस फौजफाटा तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला पंगाविण्याचे काम पोलीस करत आहेत.