ज्येष्ठ कॅमेरामन प्रकाश शिंदे यांचे निधन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅमेरामन प्रकाश गणपतराव शिंदे यांचे आज (बुधवार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, थरथराट, दे दणादण, तांबव्याचा विष्णूबाळा, अशा विख्यात चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे  

बहिरेश्वर येथे पुरण पोळीने ३१ डिसेंबर करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय…

सावरवाडी (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे ३१ डिसेंबर पुरणपोळीने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन न करीता फक्त पुरणपोळीने घरोघरी ३१ डिसेंबर साजरा करण्यात येणार आहे, असा निर्णय बहिरेश्वर ग्रामस्थांनी घेतला आहे.

जिल्ह्यात दिवसभरात १० जण कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात १० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर १,०२० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ८, चंदगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ असे १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात १० जण कोरोनामुक्त…

कोजीमाशि पतसंस्थेची सभासदांना नववर्षाची  भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोजीमाशीच्या झालेल्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये सभासदांना नवीन वर्षाची भेट म्हणून १ जानेवारीपासून नियमित कर्ज व्याजदर साडे अकरा टक्क्यावरून ११ टक्के करण्यात आला आहे. तर आकस्मिक कर्ज मर्यादा एक लाख रुपये करत त्यांचा व्याजदर दहा टक्के केला आहे. त्याचबरोबर कर्ज कपात साडेपाच टक्क्यावरून साडेतीन टक्के इतकी केली आहे. कोजीमाशी पतसंस्थेने कायमस्वरूपी सभासदांचे हीत… Continue reading कोजीमाशि पतसंस्थेची सभासदांना नववर्षाची  भेट…

नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे ३१ डिसेंबर आणि नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याबाबत राज्य शासनाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, शासनाच्या सूचनांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करुन सरत्या आणि नववर्षाचे स्वागत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. ते म्हणाले की, ३१ डिसेंबर रोजी नागरिकांनी तलाव, उद्याने, नदीघाट अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने… Continue reading नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत गोंधळ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या आज (बुधवार) झालेल्या अधिसभेत गोंधळ माजला. प्रश्नोत्तराच्या तासात विद्यापीठ प्रशासनाने खोटी उत्तरे दिल्याने विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटनेने सभात्याग केला. या वेळी सभागृहाबाहेर पडून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. तसेच विद्यापीठ विकास आघाडी आणि सुटा संघटनेने घोषणाबाजी करत विद्यापीठ प्रशासनाच्या गैरकारभाराचा निषेध केला. या वेळी २३ प्रश्नांपैकी तीन प्रश्नांवर… Continue reading शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत गोंधळ…

कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत गव्यांचा वावर असल्याचं स्पष्ट झाले. असं का व्हावं, असा प्रश्न प्रत्येकाला पडला. उत्तरही अगदी सोपं आहे. माणसांचा अति स्वार्थ त्याला कारणीभूत आहे, हे मान्य करावेच लागेल. निसर्गाच्या सान्निध्यात राहणे वेगळे आणि अतिक्रमण करणे वेगळे… पूर्वी वानप्रस्थाश्रम व्यवस्थेत वयोवृद्ध जंगलात जात असत. आता कुणीही उठतो, जंगलात जातो आणि तिथे अतिक्रमण करतो. आपण जंगली… Continue reading कोल्हापुरी ठसका : पर्यटनासाठी माणसं जंगलात आणि गवे शहरात..!

कोल्हापूरच्या विकासात लोकसहभागही महत्त्वाचा : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. यासाठी काही नव्या संकल्पना योजाव्या लागतील. हे काम केवळ लोकप्रतिनिधींचे नसून यामध्ये शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. कोणत्याही विकासकामात लोकसहभाग महत्त्वाचा असतो, त्याशिवाय ते पूर्णत्वास येउच शकता नाही, असे मत आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले. आज (बुधवार) आ. पाटील यांनी ‘लाईव्ह मराठी’च्या… Continue reading कोल्हापूरच्या विकासात लोकसहभागही महत्त्वाचा : आ. ऋतुराज पाटील

वृत्तपत्र विक्रेता ग्रा.पं.निवडणुकीच्या रिंगणात..!

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक मातब्बरांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर दुसरीकडे एक सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेताही निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमाविण्यासाठी उतरला आहे.   आज (बुधवार) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील माद्याळ क || नूल येथून वृत्तपत्र विक्रेता आनंद… Continue reading वृत्तपत्र विक्रेता ग्रा.पं.निवडणुकीच्या रिंगणात..!

भारतात आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकाराच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने आज (बुधवार) घेतला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, आता ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.… Continue reading भारतात आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी

error: Content is protected !!