कोल्हापूर ( प्रतिनिधी ) 22 वर्षीय तरुणी गेल्या एक वर्षापासून कोल्हापुरात आली आहे. या तरुणीची संशयित आरोपी इम्रानखान शेरखान पठाण याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून गेले वर्षभर पीडित तरुणीवर संशयिताने अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार करणाऱ्या इम्रानखान शेरखान पठाण (वय 25, रा.जूनी म्हाडा कॉलनी, आर.के.नगर) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय पीडिता गेल्यावर्षी कोल्हापुरात आली होती. कामाला जात असताना रस्त्यात तिची इम्रानखान पठाण याच्याशी ओळख झाली आणि घात झाला.

ओळखीचा गैरफायदा घेतला आणि घात झाला…

इम्रानखान यानं ओळखीचा गैरफायदा घेऊन पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे मोबाईलवर अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आज इम्रानखानला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक कली.