कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : जिल्ह्याचे नेते पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला. सकाळी नऊ वाजता शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या अंबाबाई मंदिरामध्ये जमा झाले. सर्वांनी अभिषेक करून साडी-चोळीचा आहेर अंबाबाईला अर्पण केला व मंत्री मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्याकडून अजून चांगले काम व्हावे. कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सक्षमपणाने काम करता यावं. कोल्हापूरची प्रगती करता यावी, असे सामर्थ्य त्यांना द्यावे, अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी सर्व माजी नगरसेवक उत्तम कोरणे, उदयभाऊ साळोखे, महेश सावंत, प्रकाश गवंडी, प्रकाश काटे, नाना आयरेकर, अशोक रेडेकर, नंदू गुजर, सत्तार मुल्ला, रेखा आवळे, जाहिदा मुजावर, महेंद्र चव्हाण, संजय कुराडे, संजय पडवळे, पूजा साळोखे, युवराज साळोखे, रेहाना नगरकट्टी, अच्युतराव साळोखे, दिलीप टोणपे, बी. के. भास्कर, सचिन सुतार, बजरंग देवकर, शोभना खामकर,सुनिता राऊत, अल्फाज शेख आदींसह प्रमुख मान्यवर,नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.