सांगली : सांगली लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये, असे म्हणत विशाल पाटील यांनी महाविकासआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘पुढे बोलताना विशाल पाटील म्हणाले, ‘काँग्रेस एकसंघ होती, हे कुणाला बघवले नाही. काँग्रेस पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळू दे, मी माघार घेईन. पण काँग्रेस पक्ष आणि काही घराणे संपवून जावेत, असा उद्देश काही जणांचा आहे, मला अजून ही विश्वास आहे. मला उमेदवारी मिळेल”, असं काँग्रेस नेते विशाल पाटील म्हणाले आहेत.

काँग्रेस पक्षाचा हा लढा आहे. काँग्रेसमधले हे बंड आहेत. जिल्ह्यातून पदाधिकारी आलेत. प्रकाश आंबडेकर यांनी पाठिंबा दिला, आभार मानतो. जिल्ह्यातील बाळासाहेब उर्फ विश्वजित कदम यांचेही आभार मानतो. अजित घोरपडे, विलासराव जगताप यांचे आभार मानतो. वसंतदादाचे घर जेव्हा जेव्हा अडचणीत असते तेव्हा अंजनीपुत्र आमच्या मागे असतो. सुमनताई पाटील आणि रोहित आर आर पाटील याचाही मला पाठींबा असतो. प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता आज उपस्थित आहे. त्या पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्याना सूट दिली आहे. जयश्रीताई पाटील यांनी आज धाडसाने पुढे चालल्या. आज त्या माझ्या पुढे होते याचा मला अभिमान आहे. मी स्वार्थासाठी लढत नाही. 2005 साली वडील वारल्यानंतर मला उमेदवारी भेटली नाही, पण मी थांबलो. आजपर्यंत थांबलोय, मी पक्षावर एकतर्फी प्रेम केले असे विशाल पाटील म्हणाले.

आता माघार नाही : विशाल पाटील
चंद्रहार पाटील यांना देखील विशाल पाटलांनी उत्तर दिले आहे. विशाल पाटील म्हणाले, शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये. हे काँग्रेसचे बंड आहे, आमचे काँग्रेसवर प्रेम कायम रहाणार आमच्याकडून चिन्ह नेले तर वेगळ्या चिन्हावर निवडून येऊ पण खासदार कॉंग्रेसचाच होणार, आता माघार घ्यायची नाही.