कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्यावतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनखाली तसेच भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या जनजागृतीसाठी “ओबीसी जागर रथयात्रा” काढण्यात आली आहे. आज (शनिवार) हा रथ कोल्हापूर येथे दाखल झाला.

ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश यादव, सरचिटणीस हेमंत आराध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये “ओबीसी जागर रथयात्रा” शहरातील प्रवास शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते बिंदू चौक येथे करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी “उठ ओबीसी जागा हो, अभियानाचा धागा हो”, “ओबीसी के सन्मान मै भाजपा मैदान मै”, “ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे” अशा घोषणा दिल्या.

ही “ओबीसी जागर रथयात्रा” आज पूर्ण दिवस शहरातील प्रमुख चौक तसेच परिसरात तर पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करवीर, गडहिंग्लज, कागल, पट्टण कडोली, हुपरी, कुरुंदवाड अब्दुल लाट, शिरोळ अशा तालुक्यांच्या ठिकाणी प्रवास करत दिनांक २३ रोजी जयसिंगपूर येथे या रथ यात्रेचा समारोप होणार आहे.

याप्रसंगी ओबीसी महिला अध्यक्षा विद्या बनछोडे, वर्षा कुंभार, चिनार गाताडे, विद्या बागडी, संध्या तेली, रजनी माळकर, विना यादव, प्रिया यादव, सुजाता पाटील, राजेंद्र वडगांवकर, अरविंद वडगांवकर, आदीसह ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.