मुरगूड (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे आप्पाची वाडी येथील हालसिद्धनाथची यात्रा 8 ते 12 ऑक्टोबरपर्यंत संपन्न होत आहे. यावेळी कुर्ली मंदीरातून नाथांची पालखी, सबीना पालखी मार्गावरुन आप्पाचीवाडी घुमट मंदीराकडे रवाना, पुढे वाडा मंदीरातून नाथांच्या (कुर्ली व आप्पाचीवाडी) दोन्ही पालख्या सबीनासह खडक उत्सव मंदीराला प्रदक्षिणा घालून उत्सव श्रींची प्रतिष्ठापना, रात्री ढोल जागर आदी कार्यक्रम होणार आहेत.

तर 12 ऑक्टोबरला सकाळी नाथांची घुमटातील भाकणूक, पालख्या सबीनासह खडक उत्सव मंदीराला प्रदक्षिणा, रात्री कुर्ली मंदीरात पालखी सबीना पोहोचल्यावर यात्रेची सांगता होणाराय. सालाबादप्रमाणे परगांवचे जे मानकरी यात्रेसाठी येतात त्यांना श्री हालसिध्दनाथ देवस्थानकोठीमध्ये देवस्थान ट्रस्टकडून मानाची पान सुपारी, भाताची करड दिली जाणार आहे.