कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना ‘आऊटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स, हायर एज्युकेशन अँड एक्सटेन्शन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू येथील चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे किटकशास्त्रज्ञ डॉ. वसंदराज डेव्हिड यांच्या हस्ते डॉ. के. प्रथापन यांना सन्मानित करण्यात आले.

कृषी विज्ञान, वनस्पती पोषण, तण व्यवस्थापन, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि मधमाशी पालन, उच्च शिक्षण, विस्तारासाठी दिलेले योगदानाबद्दल डॉ. के. प्रथापन यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.