मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत. उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

आठवड्याला आढावा घेऊन निर्णय दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून जिल्ह्यांचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहितीही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

कुठल्या जिल्ह्यात किती टप्प्यांचा समावेश?

पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे – सर्व १८ जिल्हे अनलॉकचा निर्णय

दुसर्‍या टप्प्यात ५ जिल्हे

तिसऱ्या टप्प्यात १० जिल्हे

चौथ्या टप्प्यात २ जिल्ह्यांचा समावेश

पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील. जिम, सलून सुरू राहणार, बस १०० टक्के क्षमतेने, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार, ई कॉमर्स सेवा सुरू राहणार, गार्डन, वॉकिंग ट्रॅकला परवानगी, थिएटर सुरू होणार, चित्रपट शूटिंगला परवानगी

मुंबईत आठवड्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला तर मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होतील. सध्या मुंबईत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंदच असणार आहेत. ठाणे पहिल्या टप्प्यात येत असला तरी तिथे लोकल प्रवासाला मुभा नसेल.

अनलॉक झालेले राज्यातील १८ जिल्हे पुढीलप्रमाणे – भंडारा, बुलढाणा, चंदपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ

दुसरा टप्पा  दुसऱ्या टप्प्यात एकूण ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांत काही निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये ५० टक्के हॉटेल सुरू, मॉल्स, चित्रपटगृह – ५० टक्के क्षमतेने सुरू, मुंबई लेवल २ मध्ये असल्याने लोकल बंदच राहणार, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले, लग्न सोहळा मॅरेज हॉल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत, अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल, मिटिंग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत, बांधकाम, कृषी काम खुली राहतील.

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे पुढीलप्रमाणे – अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद, कोल्हापूर

चौथ्या टप्पादोन जिल्ह्यांचा समावेश पुणे, रायगड

 पाचवा टप्पा – उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे.